Internal conflict in BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजप फुटीच्या उंबरठ्यावर?

Allegation of sidelining loyalists ahead of local body elections : निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, कार्यकर्त्यांत नाराजी

Deulgaoraja गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भाजपसमोर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात मात्र अंतर्गत नाराजीचा भडका उडाल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये दुफळी वाढताना दिसत आहे.

प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण तर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मात्र काम करणाऱ्या निष्ठावंतांना पद न देता “पुढे पुढे करणाऱ्यांना” महत्त्व दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज असून, काहींनी थेट भाजपचा दांडा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. परिणामी, पक्षात असंतोष वाढत असून निवडणुकीच्या तोंडावर ही परिस्थिती धोक्याची घंटा ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Ladki Bahin Scheme : लाडक्या जावयांचाही डेटा सरकारच्या रडारवर, उत्पन्न तपासले जातेय

यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन गटांनी वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. एका गटाने महायुतीतील शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर यांना तर दुसऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज कायंदे यांना पाठिंबा दिला. त्यावेळची फुट आता अधिक गडद होत असल्याचे दिसते. अलीकडेच तालुकाध्यक्षपदावरून झालेल्या बैठकीत पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. मध्यस्थी करून प्रकरण थोपविण्यात आले असले तरी नाराजी दाबली गेली नसल्याचे स्पष्ट झाले.

Dilipkumar Sananda : रोहणकारांचे उपोषण म्हणजे जनतेची दिशाभूल, सानंदांची टीका

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदासाठीही रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी नगरसेवक निशिकांत भावसार, सुरज हनुमंते आणि मयूर पुजारी या तिघांची नावे आघाडीवर आहेत. मात्र अंतिम निर्णयावरून पक्षांतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सिंदखेड राजा मतदारसंघातील भाजपची विस्कटलेली घडी जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे कशी सांधतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.