Internal Rift in MNS : ‘मनसेला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा डाव’; संतोष नलावडे यांचे खळबळजनक पत्र!

Major Blow to Raj Thackeray in Mumbai : बाळा नांदगावकरांच्या समर्थकाचा ‘जय महाराष्ट्र’; जागावाटपातील गोंधळावरून नेत्यांवरच साधला निशाणा

Mumbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) धक्क्यावर धक्का बसत आहे. संतोष धुरी यांच्यानंतर आता पक्षाचे आणखी एक निष्ठावान नेते संतोष नलावडे यांनी राज ठाकरेंची साथ सोडली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत गंभीर आणि भावनिक आरोप करत, “पक्षाला संपवण्यासाठी अंतर्गत नेत्यांनीच विषारी इंजेक्शन दिले आहे,” असा खळबळजनक दावा पत्राद्वारे केला आहे.

बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे संतोष नलावडे शिवडी आणि दक्षिण मुंबईत पक्ष संघटन मजबूत करण्यात आघाडीवर होते. मात्र, पक्ष सोडताना त्यांनी लिहिलेल्या पत्रात मनसेच्या वरिष्ठ नेतृत्वावर तोफ डागली आहे: “नेत्यांनीच आमचा राजकीय बळी दिला आहे. ज्यांच्यासाठी आयुष्य पणाला लावलं, त्यांनीच जागावाटपात ‘हाराकीरी’ केली,” असा थेट आरोप त्यांनी केला. “आम्ही ज्या वटवृक्षाच्या सावलीत विसावायचो, तोच वटवृक्ष काही स्वार्थी नेते छाटत आहेत. या वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे,” असे दाहक शब्द त्यांनी वापरले आहेत.

Municipal election: इम्तियाज जलील भाजपचे हस्तक असून त्यांनी शहराला व्यसन लावले

नलावडे यांनी आपल्या पत्रात पक्षाच्या निवडणूक रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवडी, माहिम, वरळी, कांजुरमार्ग आणि भांडुप यांसारख्या मराठी माणसाच्या बालेकिल्ल्यांमध्ये मनसेची ताकद असतानाही तिथे जागा का सोडल्या नाहीत? असा सवाल करत त्यांनी पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला.

Raj Thackeray : मोदींची जादू नसती तर भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळला असता

शिवडी भागात नलावडे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या जाण्यामुळे मनसेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. “जिथे पक्षीदेखील बसत नाहीत अशा विषारी झाडाखाली थांबण्यात अर्थ नाही,” असे म्हणत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीनंतर पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम या राजीनाम्यामुळे आता चव्हाट्यावर आला आहे.