Invalid ration card search campaign : अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम; गरिबांच्या रेशनवर गंडांतर?

 

No ration without income and residence proof : उत्पन्न आणि रहिवासी पुराव्याशिवाय रेशन नाही, शासनाची मोहिम सुरू

Akola केंद्र शासनाच्या ‘लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण प्रणाली’च्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्य सरकारने आता गरिबांचे रेशन कार्ड काढून घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. ‘अपात्र शिधापत्रिका शोध मोहिम’ या नावाने सुरू झालेल्या कारवाईत लाखोंच्या संख्येने रेशन कार्डांची तपासणी होणार असून, पुरावे सादर न करणाऱ्यांचे कार्ड थेट रद्द होणार आहे.

या मोहिमेमुळे गरजू कुटुंबांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाकडून गरिबांवरील ही कारवाई सामाजिक दृष्टिकोनातून कितपत न्याय्य आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तालुका आणि रेशन दुकानदारांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या मोहिमेत रेशनकार्डधारकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सर्व स्त्रोतांतील एकूण वार्षिक उत्पन्नाची माहिती आणि अलीकडील एक वर्षातील रहिवासी पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अपात्र ठरणाऱ्यांना नोटीस देऊन १५ दिवसांची मुदत देण्यात येणार असून, त्यानंतर रेशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

Buldhana incident : उष्माघात नव्हे, मेंदूज्वर? सहावीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे शेगाव हादरलं!

शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील कर्मचारी तसेच १ लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आढळले, तर ते तत्काळ रद्द करण्यात येणार आहेत. त्यांना उत्पन्नानुसार नवीन कार्ड देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये अस्तित्वात नसलेल्या, दुबार किंवा मृत व्यक्तींच्या नावावरील रेशनकार्ड हटवण्यात येणार आहेत, हे योग्य असले तरी अनेक गरजू नागरिकांकडे अद्ययावत दस्तावेज नसल्याने त्यांचेही रेशन बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या मोहिमेच्या नावाखाली गरिबांवर अन्याय होणार नाही ना, याची हमी कोण घेणार? गरजूंना रेशन मिळावे यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक आणि जनसामान्यांना समजेल अशा पद्धतीने राबवली जाण्याची गरज आता अधोरेखित होत आहे.

JyotiRao Phule Film : ज्योतिराव फुले सिनेमा जसाच्या तसा प्रदर्शीत करा अन् तोही टॅक्स फ्री !

 

तालुकानिहाय शिधापत्रिका संख्या (अंदाजे)
अकोला तालुका – 89,538
अकोला शहर – 73,653
बार्शिटाकळी – 42,457
पातूर – 36,065
मुर्तिजापूर – 46,991
बाळापूर – 48,470
अकोट – 57,912
तेल्हारा – 48,659
एकूण – 4,43,745 रेशनकार्ड धारक