Iran israel war : जग हादरलं! इराणचा इस्रायलवर 105 क्षेपणास्त्रांचा मारा!

iran-israel-war-105-missiles-attack-middle-east-tension-2026 : मध्यपूर्वेत युद्ध भडकण्याची भीती

New Delhi : मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला असून इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने उघड युद्धाचे रूप धारण केले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हवाई हल्ले केल्यानंतर इराणनेही जबरदस्त प्रत्युत्तर देत इस्रायलवर तब्बल 105 क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नव्या व्यापक युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत होता. अमेरिकेकडून इराणवर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते, असे संकेत दिले जात होते. या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांना ‘इम्प्रेसिव्ह स्ट्राईक’ असे संबोधले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेहरान, इस्फहान, कोम आणि खोर्रमाबाद या प्रमुख शहरांमध्ये स्फोट आणि हवाई हल्ल्यांचे आवाज ऐकू आले. तेहरानमधील काही संवेदनशील परिसरांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे.

Ayushman bharat scheme : खाजगी, धर्मदाय रुग्णालयांची सभागृहात पोलखोल !

या हल्ल्यांदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामैनी यांचे निवासस्थान लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र हल्ल्यापूर्वीच त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनांमुळे इराणमध्ये संतापाची लाट उसळली असून देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

हल्ल्यांनंतर इराणने इस्रायलवर मोठा प्रतिहल्ला चढवत 105 क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांपैकी काही क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. काही भागांत सायरन वाजवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दोन्ही बाजूंनी हानीबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नसली तरी संघर्ष तीव्र होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर इराणने दिलेले प्रत्युत्तर हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता वाढवत आहे. मध्यपूर्वेतील इतर देशांनाही या संघर्षाचे परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारपेठा, तेलाचे दर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Chandrapur Municipal Corporation : महापालिका निवडणुकीतून ‘विजय’ दूर गेला अन् काँग्रेसची ‘प्रतिभा’ संपली!

या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक देशांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र दोन्ही देशांच्या आक्रमक भूमिकेमुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणत्या वळणावर जाईल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.