Iran Israel War : इराणकडे ‘बिनशर्त आत्मसमर्पण’चाच पर्याय;

iran-war-donald-trump-unconditional-surrender-offer-to-iran : सरेंडर झाल्यास इराणला पुन्हा महान देश बनवू – डोनाल्ड ट्रम्प

New Delhi : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठं विधान केलं आहे. इराणकडे आता ‘बिनशर्त आत्मसमर्पण’ करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत इराण बिनशर्त आत्मसमर्पण करत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणतीही डील होणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

मध्यपूर्वेत सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं असून इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली आणि त्यानंतर अमेरिकेने देखील या संघर्षात सहभाग घेतला. युद्धाचा आज सातवा दिवस सुरू असून दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

Vijay Wadettiwar : आज लग्न लावले, अपत्य २०४७ मध्ये होईल; अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची उपरोधिक टीका

 

या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठा दावा केला आहे. इराण सध्या मोठ्या नुकसानीत असून त्यांच्याकडे आता बिनशर्त आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत इराण सरेंडर करणार नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा करार होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, जर इराणने बिनशर्त आत्मसमर्पण केलं तर तेथे एका महान नेत्याची निवड करण्यात येईल आणि उद्ध्वस्त झालेल्या इराणला पुन्हा उभं करण्यासाठी मदत केली जाईल. इराणला जगातील एक मजबूत आणि महान देश बनवण्याचं वचनही त्यांनी दिलं आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत इराण पुन्हा जगासमोर उभा राहू शकतो, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

Katol blast : काटोल स्फोटातील जखमी झालेली आणखी एक कामगार महिला दगावली, एकूण मृतांची संख्या झाली २०

दरम्यान, युद्ध सुरू होण्यापूर्वीही ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला होता. इराणसोबत चर्चेची सर्व दारे बंद झाली असून आता कठोर भूमिका घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘बिनशर्त आत्मसमर्पण’ हा पर्याय पुढे ठेवत इराणसमोर मोठी अट ठेवली आहे.