व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Iran war update : ट्रम्प म्हणतात, पाकिस्तानने केली होती युद्ध थांबवण्याची विनंती...

Iran war update : ट्रम्प म्हणतात, पाकिस्तानने केली होती युद्ध थांबवण्याची विनंती !

Iran puts conditions before america for ceasefire: नुकसानाची भरपाई ते होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण, युद्धविरामासाठी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्यात ‘या’ अटी

New delhi अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणकडून मांडण्यात आलेल्या दहा मुद्द्यांवर आता पुढील चर्चा होणार आहे. या अटींमध्ये इराणने आपल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी महत्त्वाची मागणीही पुढे ठेवली आहे. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याने अनेक देशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

इराणने युद्धबंदीच्या करारासाठी दहा अटी मांडल्या आहेत. यात दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला न करण्याचे आश्वासन द्यावे, होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण इराणकडेच राहावे, तसेच युरेनियम संवर्धनाला परवानगी मिळावी, अशा प्रमुख अटी आहेत. याशिवाय सर्व प्रकारचे निर्बंध हटवणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तसेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या मंडळाचे सर्व ठराव रद्द करणे, इराणच्या नुकसानाची भरपाई करणे, अशा अटींचा समावेश आहे.

Salil deshmukh : शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यातून सलील देशमुख निर्दोष मुक्त; राजकीय पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान इराणवर होणारा विध्वंसक हल्ला थांबवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर, होर्मुझ सामुद्रधुनी तातडीने खुली करण्याच्या चर्चेला गती देण्यासाठी दोन आठवड्यांची शस्त्रसंधी मान्य करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यातील अनेक प्रलंबित मुद्द्यांवर तत्त्वतः सहमती झाली आहे. मात्र, या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीचा उद्देश अंतिम कराराची रूपरेषा निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ मिळावा, हा आहे.

Baramati bypoll : बारामती पोटनिवडणूक रंगतदार; ५५ उमेदवार रिंगणात

दरम्यान, या घडामोडींमध्ये पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका घेत पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सामाजिक माध्यमांद्वारे माहिती देत अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींना १० एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या बैठकीतून दोन्ही देशांमधील तणावाचा तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!