Jai pawar : “विमान हवेत अन् पायलटच्या सीटवर मालक झोपला”

jai-pawar-shocking-video-vsr-owner-sleeping-in-cockpit-demand-arrest-dgca-action : जय पवारांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, व्हीएसआर कंपनीविरोधात अटकेची मागणी

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाकडून या विमान दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. घटनेला महिना पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ शेअर करत मोठा खुलासा केला आहे. संबंधित व्हिडीओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान मुख्य पायलटच्या सीटवर बसून झोपलेले दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जय पवार यांनी भावनिक शब्दांत पोस्ट करत या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या वडिलांचा मृत्यू ही आयुष्यभराची वेदना आहे आणि अशा प्रकारचा निष्काळजीपणा कदापि सहन केला जाऊ शकत नाही. आकाशात विमान उड्डाण करत असताना मुख्य पायलटच्या सीटवर बसलेली व्यक्ती झोपलेली दिसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे केली आहे.

Iran israel war : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी

जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीची सर्व विमाने चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत, तसेच कंपनीचे मालक रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ही केवळ एका मुलाची वेदना नसून प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठीचा आवाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून संबंधित व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या दुर्घटनेनंतर सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पहिल्या दिवसापासूनच संबंधित कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. जय पवार यांनी सादर केलेल्या या नव्या व्हिडीओमुळे त्यांच्या भूमिकेला अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

Crime news : अकोल्यात ठाकरे गटाच्या शहरप्रमुखावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न!

सदर प्रकरणामुळे विमान सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून आता संबंधित यंत्रणा कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.