Jain Muni Nileshchandra : अमराठी बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर देऊ

Controversial statement sparks turmoil in politics : ‘महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही’, जैन मुनी निलेशचंद्र यांचे वादग्रस्त वक्तव्य

Mumbai जैन मुनी निलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, ‘मारवाड्यांना किंवा अमराठी बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे मीरा-भाईंदरसह मुंबई-ठाण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जैन मुनी निलेशचंद्र यांनी आपल्या भाषणात सांगितले की “महाराष्ट्रात मराठीचा आम्ही सन्मान करतो, तसेच महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही आदर करतो. मात्र हा महाराष्ट्र कोणाच्या एकाच्या बापाचा नाही. भाषेच्या नावावर जर मारवाडी किंवा अमराठी बांधवाला हात लावला, तर सहन केलं जाणार नाही आणि जशास तसं उत्तर देऊ.”

BMC Election : किरीट सोमय्या यांच्या मुलाला उमेदवारी

मिरा-भाईंदरमध्ये आयोजित सनातन धर्मसभा या प्रवचन कार्यक्रमात जैन मुनी निलेशचंद्र बोलत होते. हा कार्यक्रम शिवसेना (शिंदे गट) समर्थित सामाजिक संस्थेमार्फत आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य आल्याने त्याला अधिक राजकीय रंग मिळाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीने यापूर्वी जैन मुनींच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली होती. मनसेने मराठी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली होती, तर मराठी एकीकरण समितीने मराठी मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. आता निलेशचंद्र यांनी मारवाडी समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा उचलल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : रविवारी मध्यरात्री मातोश्रीवर काय घडले? राजकारणात खळबळ

जैन समाज हा व्यापारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज मानला जातो. त्यामुळे त्यांच्या नेत्याचे असे विधान निवडणुकीच्या राजकारणात महत्त्वाचे ठरते. या विधानानंतर राजकीय वर्युळात संतापाची लाट उठली आहे. यामुळे मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी निवडणुकीत या विधानाचा किती परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.