Pune crime exploits of Supekar, a relative of the Hagavane family : पुण्यातील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक सुपेकर याचे कारनामे चर्चेत
पुणे : बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले हगवणे यांचे नातेवाईक वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे कारनामे समोर येत आहेत. सुपेकरांनी कुख्यात गुंडांना मदत करण्यासाठी तसेच सामान्यांना जामीन देण्याच्या नावाने करोडोची लाच मागण्याचे आरोप होत आहेत. एका प्रकरणात त्यांनी जामीन मिळवून देण्यासाठी 550 कोटी रुपये मागवल्याचा आरोप सध्या गाजत आहे.
वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्याबाबत दररोज खळबळजनक तक्रारी समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक हा कारागृह या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती कारागृत बंदिस्त कारागृहात असणाऱ्या एका कैदयाकडून 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे.
या कैद्याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयात तशी तक्रार केली आहे. एवढेच नाही तर या संदर्भात त्यांना तशा नोटीस पण पाठवल्याचे सांगितले जात आहे. पुण्यातील सावकार नानासाहेब आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांनी सूनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन गेली काही वर्षे तुरुंगात आहेत. या बाप-लेकांनी त्यांच्या वकिलांमार्फत सुपेकर यांनी त्यांना लाच मागितल्याची तक्रार आहे. गणेशचे लग्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या दिपक साळुंखे यांच्या मुलीसोबत 2017 मध्ये झाले होते. मात्र, हुंड्यासाठी तीचा सतत छळ होत होता. या संबंधातील तक्रार 2021 मधे करण्यात आली. त्यानंतर गायकवाड बाप लेकांना अटक झाली होती.
नाना गायकवाडच्या सावकारी विरुध्द अनेक जणांनी तक्रारी केल्याने त्याच्यावर मकोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र, येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्याला आणि गणेशला अमरावती कारागृहात हलविण्यात आले . गायकवाडच्या वकीलाने केलेल्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरिक्षक असताना 19 ऑगस्ट 2023 ला अमरावती कारागृहात आले होते आणि तिथे त्यांनी गायकवाडला जामिनासाठी लाच मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात दाखल याचिकेत केला आहे.
तुम्ही मला पैसे द्या, मी तु्म्हाला या प्रकरणातून बाहेर काढतो, असे सुपेकर यांनी म्हटल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता सुपेकर यांच्यावर या तक्रारीवर काय कारवाई होते की आरोपांचा तपास होईल या बद्दल उत्सुकता आहे.
Local Body Elections : भाजपचा तरुण नेतृत्वावर विश्वास; मंदार बाहेकर नवे शहराध्यक्ष
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली. सुपेकर हे विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आली आहे. याशिवाय त्यांनी पदाचा गैरवापर केल्याची इतर प्रकरणे पण समोर येत आहेत.
#jalindarsupekar #punecrime #vaishnavihagawane #supekarblame #supekarbribery #dowarydeathcade #जालिंदरसुपेकर #पुणेक्राईम #वैष्णवीहगवणे # सुपेकरलाचखोरी #हुंडाबळी