व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान...

Parliament Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान – केंद्रीय मंत्री रिजिजू

Monsoon session instead of special session after Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर नंतर विशेष ऐवजी पावसाळी अधिवेशन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लाऊन धरली होती. दरम्यान, केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्या नुसार हे अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी जाहिर केल्या आहेत. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी विरोधक सतत करत होते. या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष घोषणा केली आहे.

School ID scam : काय आहे ‘तुकडी घोटाळा’, अनिल देशमुखांनी सांगितले !

पावसाळी अधिवेशनात विमा दुरुस्ती विधेयक मांडले जाऊ शकते. हे विधेयक विमा क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या संदर्भात आहे. या विधेयकाचा मसुदा तयार असून तो लवकरच कॅबिनेटसमोर मंजुरीसाठी सादर केला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभाग हे विधेयक संसदेत सादर करण्याची प्रक्रिया सुरू करेल असे सांगण्यात येत आहे.

Muslim festivals : नितेश राणेंच्या ‘त्या’ वत्कव्यावर काय म्हणाले कार्यकारी प्रदेशाध्यक्ष ?

या पूर्वी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत सदनाची आत्तापर्यंतची सर्वात प्रदीर्घ बैठक गुरुवार, 3 एप्रिल रोजी झाली. ती सकाळी 11 वाजता सुरू झाली आणि 4 एप्रिल रोजी पहाटे 4:02 वाजेपर्यंत चालली. या सभागृहात विक्रमी 49 खाजगी सदस्यांची विधेयकेही मांडण्यात आली. एकूणच, सभागृहाने एकूण 159 तास काम केले असे जाहीर करण्यात आले होते.
लोकसभेत 26 बैठका झाल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 10 सरकारी विधेयके मांडण्यात आले. वक्फ दुरुस्ती विधेयक आणि मुस्लिम वक्फ (निर्मूलन) विधेयकासह 16 विधेयके मंजूर करण्यात आली.

#पावसाळीअधिवेशन #संसदअधिवेशन #ParliamentMonsoonSession
#MonsoonSession2025 #Sansad2025
#लोकशाहीचा आवाज #DebateInParliament
#OppositionSpeaks

error: Content is protected !!