Manoj Jarange Patil’s emotional speech at Narayangad : मनोज जरांगे पाटलांचं नारायणगडावर भावनिक भाषण
Beed : विजयादशमी निमित्त राज्यभरात दसरा मेळावे रंगले असताना नारायणगडावर मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला उद्देशून भावनिक भाषण केले. रुग्णालयातून थेट गडावर आलेल्या जरांगे पाटलांच्या डोळ्यात या वेळी अश्रू तरळले.
विराट संख्येने जमलेल्या बांधवांना त्यांनी “माझा मानाचा जय शिवराय” मनात भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले “मायबापहो, मला बोलायला लई त्रास होतोय. पण आपला गड नगद आहे म्हणून बोलायला ताकद मिळतेय. लई वेदना आहेत, शरिराला त्रास आहे. मी ५-६ महिन्यांपूर्वी सांगितलं होतं, मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे.”
Prajakata Mali : ..अन् म्हणूनच सुधीरभाऊंना विकासपुरूष म्हटले जाते !
हे ऐकून नारायणगडावर वातावरण भावूक झालं आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
शिक्षण आणि प्रशासनातील सहभागावर भर देत
जरांगे म्हणाले “जातीला सांभाळायचं असेल तर तुम्हाला शासक व्हावं लागेल, प्रशासक व्हावं लागेल. तहसीलदार, पीएसआय, कलेक्टर, अधिकारी बनवा. तुमचं लेकरू प्रशासनात गेलं तर गरीब समाजाला आधार मिळेल. सध्या बोगस लोकं बसलेत, बोगस आरक्षण घेतलंय.” त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तत्काळ कामाला लागा असं आवाहनही केलं.
Farmers in Crisis : शेतकऱ्यांना राज्य बॅंकेकडून १० कोटींची मदत !
इंग्रजांच्या जनगणनेवर प्रश्नचिन्ह
जरांगे म्हणाले “आमचं गुलामीचं गॅझेट आहे. 1931 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण घेतलं, मग इंग्रज तुमच्या घरात राहत होते का? आम्ही बिघडलेल्या रक्ताचे नाही. तुम्ही अकबरकडून पळून आलात आणि निजामाची चाकरी केली असं आम्ही म्हणायचं का? पण आम्ही असं बोलत नाही.”
राजकीय नेत्यांवर थेट हल्लाबोल करत
जरांगे म्हणाले “आम्ही कुणाला घाबरत नाही. माजलेल्यांना नीट करायची ताकद आमच्यात आहे. मराठ्यांनी तीस वर्षं निवडून दिलं, पण आता मापात राहा. दया-माया कमी करा. मराठ्यांच्या विरोधात जो उभा राहील, त्याला निवडणुकीत खपाखप पाडा.”
America in chaos : टॅरिफचा दबाव आणणाऱ्या अमेरिकेत मोठा हाहा:कार !
एमओबीसी समाजाला दोष नको म्हणतत्यांनी स्पष्ट केलं ओबीसी समाजाला दोष देऊ नका. यात फक्त काही नेते आहेत. जसं छगन भुजबळ बावचाळलेत. त्यामुळे काही मोजक्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण समाजाला जबाबदार धरणं चुकीचं आहे. विजयादशमीच्या या दिवशी नारायणगडावरील जरांगे पाटलांचं भावनिक भाषण मराठा समाजात नवी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आलं अशी प्रतिक्रिया या निमित्ताने व्यक्त होत आहे.
_____








