Assistance of ₹3,400 is insult of the farmers : तुटपुंज्या मदतीवरून जयश्री शेळके यांची राज्य सरकारवर टीका
Buldhana राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली एकरी ३४०० रुपयांची नुकसानभरपाई ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे, अशी तीव्र टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे. ही मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई तात्काळ द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून उत्पादन खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत केवळ ३४०० रुपयांची मदत जाहीर करणे ही शेतकरीविरोधी मानसिकता दर्शवणारी भूमिका आहे, असा आरोप शेळके यांनी केला. त्यांनी शेतकऱ्यांना किमान एकरी २० हजार आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
March is violent : ७ आदिवासी संघटनांच्या मूक मोर्चाला हिंसक वळण !
दरम्यान, मोताळा तालुक्यातील खामखेड, गुळभेळी, उबाळखेड, नळकुंड या गावांमध्ये जयश्री शेळके यांनी नुकसानीची पाहणी केली. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्व्हेनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल १०४ गावे बाधित झाली आहेत. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील १३ व मोताळा तालुक्यातील ६ गावांना मोठा फटका बसला आहे. पाहणीदरम्यान त्यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.
राज्य सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा देत जयश्री शेळके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली आहे.








