Distribute wheat to ration card holders during the festive season : उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन
Buldhana शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Uddhav Balasaheb Thackarey पक्षाच्या प्रवक्ता ॲड. जयश्रीताई शेळके यांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेशनकार्डधारकांना गव्हाचे वाटप तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून त्यांनी शासनाच्या अन्नधान्य धोरणातील विसंगतीवर लक्ष वेधले.
निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत जिल्ह्यात विक्रमी प्रमाणात ज्वारीची खरेदी झाली असली तरी शासनाने गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप सुरू केले आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबांना गहू मिळणे बंद झाले असून आहारातील समतोल बिघडून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Mahayuti government : सरकारच्या निषेधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी थाळ्या वाजवल्या!
“गहू हा जिल्ह्यातील लोकांच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत गव्हाऐवजी ज्वारी देऊन जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. पोळी हा बुलढाण्यातील अन्नसंस्कृतीचा आत्मा आहे. शासनाने त्वरित गव्हाचे नियमित वाटप सुरू करावे,” असे शेळके यांनी निवेदनात नमूद केले.
Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या राज्यातील नव्या शिलेदारांची घोषणा!
तसेच गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, नवरात्र, दसरा आणि दिवाळी अशा महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर गव्हाचे वितरण थांबविणे अन्यायकारक ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ज्वारीचे वाटप करावयाचे असल्यास ते गहू व तांदळाच्या अतिरिक्त प्रमाणात करावे, अन्यथा जनतेत प्रचंड नाराजी उसळेल,” असा इशारा देखील शेळके यांनी दिला. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याचे धान्य उपलब्ध झाले आहे. मात्र, इॅ पाॅस मशिनमध्ये डाटाच उपलब्ध नसल्याने गेल्या २० दिवसांपासून धान्याचे वितरण थांबले आहे. त्यामुळे, ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना धान्यापासून वंचित रहावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.








