Project-affected farmer jumps into river during protest : जिगाव प्रकल्पातील मोबदल्याचा प्रश्न चिघळला; शासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह
Jalgao Jamod जिगाव प्रकल्पातील जमीन अधिग्रहण मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांचा रोष चिघळला असून, स्वातंत्र्यदिनी झालेल्या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने पूर्णा नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. दाेन दिवसांच्या शाेध माेहिमेनंतर या आंदाेलनकर्त्याचा मृतदेह शाेधण्यात प्रशासनाला यश आले. या घटनेमुळे जिगाव प्रकल्पातील पुनर्वसीतांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शासनाच्या निष्क्रियतेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
आडोळ खुर्द येथे प्रकल्पग्रस्तांनी विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्ट राेजी जलसमाधी आंदोलन सुरू केले हाेते. या आंदाेलनादरम्यान विनोद पवार या शेतकऱ्याने नदीत उडी घेतली. विशेष म्हणजे मला पाेहणे येत नाही, माझा शेवटचा राम राम घ्यावा, असे म्हणून या आंदाेलन कर्त्याने उडी घेतली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पाेलीसांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे, ते नदीच्या पात्रात वाहून गेले. या घटनेनंतर प्रशासनाची एकच तारांबळ उडाली हाेती. विनाेद पवार यांचा शाेध घेण्यासाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना पाचारण करण्यात आले हाेते. या पथकाने दाेन दिवस शाेध माेहिम राबवल्यानंतर पवार यांचा मृतदेह आढळला.
Vidarbha Farmers : पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा; लोकप्रतिनिधींचे दावे फोल
जिगाव प्रकल्पात गेलेल्या पहिले गाव असलेल्या आडाेळ खुर्द गावाचे पुर्नवसन करताना अन्याय करण्यात आल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. या गावाचे पुनर्वसन करताना प्लाटचे वितरण सात वर्षांपासून रखडलेले आहे. तसेच गावठाणचा रस्ता ही बदलण्यात आला आहे. प्रकल्पात गेलेल्या इतर गावांच्या तुलनेत आडाेळ खुर्द गावाला दुय्यम वागणुक देण्यात असल्याने येथील ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट राेजी जलसमाधी आंदाेलन केले हाेते.
Buldhana district hospital : बुलडाणा जिल्हा रुग्णालयात पिण्याचे पाणी, स्वच्छतेची बोंब!
दरम्यान, घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “शासन फक्त भाषणबाजी करतं, पण प्रकल्पग्रस्तांकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप विराेधकांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने साेडवण्यात याव्यात, अशी मागणी आता हाेत आहे.