Sanjay Raut’s serious allegations against the central government : संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
Mumbai: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “देशाच्या न्यायव्यवस्थेविषयी आदर बाळगावा असे वातावरण देशात उरलेले नाही. न्यायव्यवस्थेला जोडे मारावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला.
राऊत म्हणाले, “गेल्या १० वर्षांत धर्मांधता आणि अंधभक्तीचे जे विष कालवले गेले, त्यातून असे माथेफिरू तयार झाले. ज्यांनी सरन्यायाधीशांवर हल्ला केला, त्यांनी भारताच्या आत्म्यावर आणि संविधानावर हल्ला केला आहे. हा भारताच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे.
ते म्हणाले, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कामाशिवाय आज देशात न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास उरला नाही. आम्हाला भूषण गवई हे आशेचे किरण वाटतात. पण गेल्या १० वर्षांत मोदी आणि शाह यांनी भारतीय न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. त्यामुळे आज न्यायव्यवस्थेचा सन्मान टिकवण्यासाठी गवईंसारख्या व्यक्तींची गरज आहे.”
Shivrajabhishek : महाराष्ट्र’ चित्रपटाचा पहिला सीन शिवराज्याभिषेकाचा असावा!
राऊत म्हणाले, हे लोक म्हणतात नरेंद्र मोदी हे विष्णूचे १३वे अवतार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली, म्हणून त्यांना राग आला का? हे हिंदू नाहीत, हिंदुत्वावर कलंक आहेत. सनातनच्या नावाखाली ज्यांनी हल्ला केला, त्यांनी भारताच्या आत्म्यावर वार केला आहे.”
ते पुढे म्हणाले, “अशा लोकांना ‘सनातनी’ म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. अशा कृतींमुळे भारताच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे काढले जात आहेत.”
Development Centre : महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी देशातील ‘मॅग्नेट’ !
शिवसेना उद्धव गट गेली तीन वर्ष न्यायासाठी लढत आहे, असं सांगत राऊत म्हणाले, “आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत, पण आम्हाला न्याय मिळालेला नाही. न्यायव्यवस्था प्रतिष्ठा गमावत आहे. आम्हाला अजूनही न्याय मिळेल अशी आशा आहे.”
महापालिका निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी म्हटलं, “महाविकास आघाडीमध्ये युतीबाबत सध्या कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. पण आमचं ध्येय स्पष्ट आहे लोकशाही आणि संविधान वाचवणं.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी केलेल्या “न्यायव्यवस्थेला जोडे मारावे अशी परिस्थिती” या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिकार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
_____