Breaking

Justice Nitin Sambre : शासकीय योजना पोहोचल्या, तर न्यायही पोहोचेल!

Government schemes important to bring the common man under the ambit of justice : पारडसिंगा येथे विधी सेवा महाशिबीर, शासकीय योजनांचा महामेळावा

Nagpur समाजातील वंचित घटकांसाठी असलेल्या योजना प्रभावीपणे पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजना पोहोचल्या, तर ते आपोआप न्यायाच्या कक्षेत येतील, असा विश्वास मुबंई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश तथा मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी व्यक्त केला.

पारडसिंगा येथील श्री सती अनुसया माता मंदिर परिसरात आयोजित विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळावा उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूरचे न्यायाधीश तथा नागपूर जिल्हा पालक न्यायमूर्ती अभय जे. मंत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Prataprao Jadhav : कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही!

न्या. सांबरे म्हणाले, ‘न्याय व प्रशासन आपल्या दारी आल्याची अनुभूती या शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून प्रत्येकाला घेता येणे शक्य झाले आहे. आज विविध विभागांच्या 40 स्टॉल्सच्या माध्यमातून अनेक पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याचा आनंद आहे.’

ग्रामीण भागातून अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले युवक आज शेतीसाठी, नवतंत्रज्ञानासाठी स्व:ताला झोकून देत आहेत. त्यांनी ठरविले असते तर महानगरांमध्ये त्यांना सहज नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या. मात्र असे असूनही कृषी क्षेत्रात ड्रोनसारख्या तंत्रज्ञानासाठी युवा पिढी पुढे येत आहे, ही कौतुकाची बाब आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Water department : वरवंड-पिंपरखेड पाणीपुरवठा याेजनेत भ्रष्टाचार

न्या. अभय मंत्री म्हणाले, या मेळाव्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आपण अनुभवत आहोत. केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहचाव्यात याचा प्रातिनिधीक संदेश या महामेळाव्यातून आपण दिलेला आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी ज्यांच्यासाठी योजना साकारल्या आहेत त्या गरजू पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत.