Anil Parbas direct attack demands narco test : अनिल परबांचा थेट हल्लाबोल नार्को टेस्टची मागणी
Mumbai : शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या सनसनाटी दाव्यानंतर राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या वक्तव्याला ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर देत रामदास कदमांवर गंभीर आरोपांचा भडिमार केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब म्हणाले, “रामदास कदम यांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं, याची चौकशी झाली पाहिजे. 1993 साली रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी आत्मदहन केले होते. मात्र ती स्वतःला जाळून घेतली होती की तिला जाळण्यात आलं, हे अजूनही स्पष्ट नाही. म्हणूनच रामदास कदम यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे.”
त्यांनी पुढे म्हटलं, “जर नार्को टेस्ट शक्य नसेल, तर त्यांच्या मुलाने राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या वडिलांच्या उद्योगांची चौकशी करावी. रामदास कदम यांनी कोणाला बंगले बांधून दिले, कोणत्या व्यवहारातून फायदा मिळवला, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे.”
internal dispute : शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या जिल्हाप्रमुख भावावर हल्ला!
अनिल परब यांनी यावेळी दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “कदमांनी नीचपणा केला. पोरी-बाळी नाचवणाऱ्याला आम्ही उत्तर देण्याची गरज वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युसमयी मी विभाग प्रमुख म्हणून उपस्थित होतो, 24 तास मी तिथे होतो. आता 14-15 वर्षांनंतर कदमांना अचानक का कंठ फुटला? बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांना उद्धव ठाकरे यांनीच मंत्री केलं, मग त्यावेळी का तोंड बंद होतं?” असा सवाल त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूसंदर्भात कदम यांनी केलेला दावा “शंभर टक्के खोटा” असल्याचं अनिल परब यांनी ठामपणे सांगितलं. “बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोक येत होते. कुठलाही मृतदेह दोन दिवस शेवपेटीशिवाय ठेवता येतो का? ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदम यांची अक्कल गुडघ्यात आहे का? त्यांना जे सांगितलं गेलं तेच ते तोतयासारखं बोलले,” असं त्यांनी म्हटलं.
Vanchit Bahujan Aghadi : रुग्णांची लुट थांबवा, नाहीतर तोडफोड आंदोलन
अनिल परब यांनी पुढे कदमांवर आणखी गंभीर आरोप करत म्हटलं, “रामदास कदम यांच्या 100 हून अधिक गुन्ह्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांनी लोकांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्या, वाळू माफियाशी संबंध ठेवले, आणि दादागिरी केली. त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली, पण त्याने आत्महत्या का केली? याचाही तपास योगेश कदम यांनी करावा.”
Heavy rain : जि.प.चे साडेचार हजार कर्मचारी पूरग्रस्तांसाठी देणार एक दिवसाचे वेतन
परब म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मागील अधिवेशनात रामदास कदम यांना वाचवलं. एवढे गुन्हे असूनही त्यांना वाचवण्याची मुख्यमंत्री काय मजबुरी आहे? लोकांच्या जमिनी खाल्ल्या, दादागिरी केली, आणि आता ठाकरे कुटुंबावर बोट ठेवतात हा दुहेरी खेळ आम्ही उघड करू,” असा इशारा त्यांनी दिला.
या वक्तव्यांनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचंड तापलेलं वातावरण निर्माण झालं आहे.
____








