Kamalja Mata Mandir : कमळजा माता मंदिर ‘जलसमाधी’च्या उंबरठ्यावर; विलंबामुळे भाविक आक्रमक

Kamalja-mata-mandir-water-level-incresing : जागतिक वारश्याकडे सरकारचे दुर्लक्ष, पाण्याची पातळी वाढतेय

Lonar जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणार विवर सरोवर परिसरातील कमळजा माता मंदिर वाढत्या पाणीपातळीमुळे धोक्याच्या छायेत आले आहे. सरोवराच्या काठावर वसलेले हे प्राचीन मंदिर सध्या चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले असून गर्भगृहातही पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू, मूर्ती आणि संपूर्ण धार्मिक वारसा जतनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर कमळजा माता सेवा संघ व भाविकांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून मंगळवारी आंदोलनाचा तिसरा दिवस होता. वारंवार निवेदने देऊनही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मंदिराभोवती संरक्षक भिंत उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. सध्या पाणी थेट बांधकामाला स्पर्श करत असल्याने झीज वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

BMC budget 2026 : ८०,९५२.५६ कोटींचा मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर

दरम्यान, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंधरवड्यात पाणी कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचा उल्लेख भाविकांनी केला आहे. मात्र कालावधी उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Ajit Pawar plane accident : पोलीस ठाण्यात तणाव; रोहित पवार, अमोल मिटकरी यांची पोलिसांशी बाचाबाची !

वाढती पाणीपातळी ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून परिसरातील वन्यजीव अधिवास—हरिण, बिबटे, रानडुक्कर व स्थलांतरित पक्षी—यांच्यावरही परिणाम होत असल्याची स्थानिकांची भावना आहे. “संरक्षणासाठी ठोस कृती आराखडा जाहीर करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा देत भाविकांनी प्रशासनाला तातडीने समन्वित निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.