Breaking

Khadse vs Mahajan : महाजन म्हणतात, त्यांना माहीत होतं तर त्यांनी ‘ अलर्ट’ का केलं नाही ?

Khadse-Mahajan dispute gets new flare-up with rave party case : खडसे – महाजन वादात ‘ रेव्ह पार्टी’ प्रकरणाने नवा भडका

Nashik : पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी खडसेंच्या विधानाचा संदर्भ घेत प्रश्न केला आहे की, त्यांना माहीत होतं तर त्यांनी ‘ अलर्ट’ का केलं नाही ?

या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता खुद्द गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनाही चिमटा काढला आहे. महाजन म्हणाले, हा ट्रॅप होणार हे एकनाथ खडसे यांना आधीच माहीत होतं, असं ते म्हणतात, तर त्यांनी आपल्या जावयांना याबाबत आधीच सतर्क केलं पाहिजे होतं. आता असं बोलून काहीही अर्थ राहत नाही. जावई लहान मूल नाही, त्याला कोणी उचलून रेव्ह पार्टीत बसवलं नाही. त्यामुळे ही गोष्ट गंभीर आहे, आणि याची चौकशी व्हावीच.

Raut Vs Mahajan : गिरीश महाजन फडणवीसांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही

महाजन म्हणाले, माझा आयपीया प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी त्या रात्री पंढरपूरमध्ये होतो. उशिरा घरी आलो, झोपलो आणि सकाळी ही बातमी टीव्हीवर पाहिली. पोलिस तपास करत आहेत आणि अंमली पदार्थही सापडले आहेत, ही माहिती समोर आली आहे. पुढे तपासात नेमकं काय घडलं ते समोर येईल. संजय राऊत यांनी या कारवाईमागे सूडाची भावना असल्याचा आरोप केला होता. मात्र, महाजन यांनी त्यावर उत्तर देताना म्हटलं की, काही झालं की भाजपने षड्यंत्र केलं असं म्हणणं चुकीचं आहे. सत्य काय आहे ते तपासातून समोर येईल.

Chandrashekhar Bawankule : शरद पवार – देवेंद्र फडणवीस भेटीचा फायदा शेतकऱ्यांना होईल !

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात वाद सुरू आहे. खडसे यांनी महाजन यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या जावयावर रेव्ह पार्टी प्रकरणात कारवाई झाल्याने या वादात नवे वळण आले आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत आणखी काही महिला आणि पुरुष होते, दारूच्या बाटल्या, हुक्का आणि अंमली पदार्थही सापडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

Ladiki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील मोठा गैरव्यवहार उघड !

ही पार्टी ऑनलाइन बुकिंगद्वारे ठरवली गेल्याचंही प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, खडसे आणि महाजन यांच्यातील जुना वाद आता अधिक चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. महाजन यांच्या थेट आणि स्पष्ट प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

____