Khamgao municipal council : ‘लक्ष्मी’ दर्शनाशिवाय फेरफार नाही? खामगावात पालिकेची फाईल भूमिअभिलेखात अडकली

khamgao-municipal-council-file-stuck-in-land-record-office : नगरपरिषदेची चार स्मरणपत्रेही निष्फळ; ‘विशेष दर्शन’शिवाय काम होत नाही का? चर्चांना उधाण

Khamgao खामगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या जमिनीच्या फेरफाराशी संबंधित महत्त्वाची फाईल सध्या भूमिअभिलेख कार्यालयात अडकून पडल्याची चर्चा प्रशासन व राजकीय वर्तुळात रंगली आहे. नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्ण करून पाठवूनही फाईल पुढे सरकत नसल्याने यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माहितीनुसार, संबंधित फेरफार प्रक्रियेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे नगरपरिषदेने पूर्ण करून भूमिअभिलेख कार्यालयाकडे सादर केली आहेत. इतकेच नव्हे तर या संदर्भात चार वेळा स्मरणपत्रेही पाठविण्यात आली; मात्र तरीही फाईल पुढे सरकत नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी नगरपरिषद प्रशासनाची चांगलीच हेळसांड होत असल्याची चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे, सरकारी संस्थेच्या कागदपत्रांनाही असा विलंब होत असताना काही खासगी प्रकरणे मात्र वेगाने मार्गी लागत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कार्यालयीन प्रक्रियेत नेमकी अडचण आहे की काही वेगळे कारण, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

Women’s day special : उच्चशिक्षित महिला सरपंचामुळे मेळघाटच्या ‘काटकुंभ’चा कायापालट!

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शहरात बनावट मालमत्ता पत्रकाचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणातील नोंद प्रशासनाने तातडीने रद्द केली होती. बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात तत्परता दिसते; मात्र नगरपरिषदेच्या अधिकृत कागदपत्रांनाच विलंब का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Women’s day : महिला बचतगटांना मोठा दिलासा : अमरावतीत १,५०० गटांना प्रत्येकी १ लाख अनुदान

या पार्श्वभूमीवर नगरपरिषद परिसरात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही फाईल पुढे सरकण्यासाठी ‘लक्ष्मीचे दर्शन’ आवश्यक आहे का? असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे भूमिअभिलेख कार्यालयाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित फाईल लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी होत आहे.