Kisan Brigade : आमदारांच्या घरांना घेराव घालणार, किसान ब्रिगेडचा इशारा

Demand to Start Soybean Procurement Before Diwali : दिवाळीपूर्वी सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी

Akola अतिवृष्टीच्या फटक्यात आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. त्यातच शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने व्यापारी अत्यंत कमी दराने सोयाबीन खरेदी करत आहेत. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शासकीय खरेदी केंद्र सुरू न केल्यास आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या घरांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा किसान ब्रिगेडचे अध्यक्ष दिवाकर गावंडे यांनी दिला आहे.

सध्या सोयाबीनचे दर फक्त तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल इतके असून, उत्पादन खर्चदेखील निघत नाही, अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे. शासकीय खरेदी केंद्र बंद ठेवून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप किसान ब्रिगेडने केला आहे. “सरकारने फसवे पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. याची त्वरित दखल घेऊन शासकीय खरेदी तातडीने सुरू करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही,” असा इशारा ब्रिगेडच्या नेत्यांनी दिला.

Harshwardhan Sapkal : मनसेचा निर्णय इंडिया आघाडी घेणार, आमच्याकडे प्रस्ताव नाही

शेतकऱ्यांचा प्रति एकर खर्च सुमारे २० हजार रुपये येतो. मजुरी, बियाणे, खते, कीटकनाशके यांचा खर्च वाढत असताना व्यापारी कमी भावाने खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे ब्रिगेडचे नेते म्हणाले.

Local Body Elections : झेडपीच्या मातब्बरांवर आली चाचपडण्याची वेळ !

या संदर्भात किसान ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शरद वानखडे, प्रदीप पाटील गावंडे, भगवंतराव गवळी, राजेश मावळे, रामधन दामोदर, राजेंद्र जंजाळ, सिद्धार्थ तायडे आणि प्रवक्ते धनंजय मिश्रा यांनी संयुक्त पत्रक प्रसिद्ध केले आहे.