Konkan Bjp : कोकणात भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; पक्षविरोधी कारवाया केल्याने २३ नेत्यांचे ६ वर्षांसाठी निलंबन

23 leaders suspended for six years for anti-party activities : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई; बंडखोरांना आणि विरोधकांच्या समर्थकांना डच्चू; प्रभाकर सावंत यांचा कडक इशारा

Sindhudurg आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कोकणात शिस्तीचा बडगा उगारला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तब्बल २३ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे कोकणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पक्षशिस्तीच्या बाबतीत भाजप कोणतीही तडजोड करणार नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी या कारवाईची अधिकृत घोषणा केली. निवडणुकीच्या रिंगणात पक्षाने दिलेला अधिकृत उमेदवार असतानाही, काही नेत्यांनी अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवली, तर काहींनी पडद्यामागून विरोधकांना मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्या अशा २३ नेत्यांचे सदस्यत्व सहा वर्षांसाठी रद्द करण्यात आले आहे.या कारवाईत माजी सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि प्रमुख तालुका स्तरावरील नेत्यांचा समावेश आहे.

 

Ajit Pawar death news : अजितदादांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार; राज्य सरकारकडून ‘सीआयडी’ चौकशीचे आदेश!

सावंतवाडी तालुका: श्रीमती शर्वाणी शेखर गावकर, उल्हास उत्तम परब, श्रीमती स्नेहल नेमळेकर, डायगो उर्फ मायकल फ्रान्सिसी डिसोजा, जितेंद्र पांडुरंग गावकर, योगेश अशोक केणी, स्वागत रघुवीर नाटेकर, नितीन एकनाथ राऊळ.
दोडामार्ग तालुका: राजेंद्र दत्ताराम म्हाप