Ladiki Bahin Yojana : लाडकी की लबाडी? हजारो अपात्र लाभार्थींचा पर्दाफाश !

The government will recover that money, Ajit Pawars firm warning : सरकार तो पैसा वसूल करणार,अजित पवारांचा ठोस इशारा

Mumbai : महिला सक्षमीकरणासाठी सुरू झालेली ‘लाडकी बहीण’ योजना आता गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात अडकली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांच्या खात्यात दर महिन्याला रु. 1500 चा थेट लाभ दिला जातो, पण प्रत्यक्षात हा पैसा बहिणींच्या नावाने पुरुषांच्या खिशात जातोय, असं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः पुढे येत या योजनेत झालेल्या घोळांवर लक्ष केंद्रित केलं आहे. ज्यांनी अयोग्य पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत घेतली जाईल, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

ही योजना केवळ अशा कुटुंबांसाठी आहे जिथं वार्षिक उत्पन्न 2 5 लाखांपेक्षा कमी आहे. शिवाय लाभार्थी महिला 65 वर्षांपेक्षा कमी वयाची असावी आणि सरकारी सेवेत नसावी, असा स्पष्ट निकष आहे. याशिवाय एकाच घरातून केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण सरकारी नोकरी असलेल्या महिलांनीही लाभ घेतला, वयोमर्यादा ओलांडलेल्या महिलांचे खातेही सक्रिय, काही घरांमध्ये तीन, चार महिलांचेही नाव आणि त्याहून भयंकर 14 हजार हून अधिक पुरुषांनीही ‘लाडकी बहीण’ बनून रक्कम उचलल्याचा पर्दाफाश झाला आहे.

Ladki Bhahin Yojana : हजारो पुरुषांनी घेतला ‘ लाडकी बहीण’ योजनेचा लाभ

ही बाब समोर येताच अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, अपात्र लाभार्थ्यांकडून सर्व पैसे वसूल केले जातील,असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
प्रशासनाकडून सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, अपात्र महिलांची व पुरुषांची नावे योजनेतून वगळली जात आहेत. यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उचलण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत. अजित पवारांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे लाडकी बहीण योजनेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी पुढील काळात मोठे पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

____