No OTP, Network Down; Beneficiaries Frustrated : ई-केवायसीसाठी ‘लाडक्या बहिणींचं’ मध्यरात्रीपर्यंत जागरण
Buldhana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे. मात्र, जिल्ह्यातील नेटवर्क समस्या आणि संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया बहिणींसाठी डोकेदुखी ठरत आहे. ओटीपी वेळेवर न मिळाल्याने अनेक महिला मध्यरात्रीपर्यंत जागरण करून ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांची झोप उडाली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन लाभार्थींनी स्वतःचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करूनच प्रक्रिया पूर्ण करता येते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० इतकी आर्थिक मदत मिळते.
Food and drugs department : तीन हजार मेडिकल स्टोअर वाऱ्यावर, शासन-प्रशासन गप्प!
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. सुरुवातीला निवडणुकांपूर्वी सर्व अर्जांना मंजुरी देऊन लाभ सरसकट देण्यात आला होता. मात्र, आता शासनाने पात्रतेची पुन्हा तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी लाभार्थी महिला तसेच त्यांचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
महिलांना घरबसल्या संकेतस्थळावरून ई-केवायसी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी नेटवर्क समस्या, संकेतस्थळ ठप्प होणे, ओटीपी न येणे किंवा एरर येणे यामुळे महिलांना दिवसभर प्रयत्न करावा लागत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण करून प्रक्रिया पूर्ण करण्याची वेळ अनेकांवर येत आहे.
ई-केवायसीसाठी शासनाने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. परंतु जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याने आणि तांत्रिक अडचणी कायम असल्यामुळे मुदत संपेपर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लाभ बंद होईल, या भीतीने महिला चिंतेत आहेत. शासनाने तातडीने स्थिर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिला वर्गाने केली आहे. अनेक भागांतील नेटवर्क समस्येमुळे एकाच वेळी हजारो युजर्स संकेतस्थळावर लॉगिन करतात, त्यामुळे संकेतस्थळ ठप्प होते आणि ओटीपी मिळत नाही.
Local Body Elections : निवडणूक लढायचीये? पहिले अर्ज करा; काँग्रेसचे आवाहन
तसेच, काही लाभार्थ्यांच्या पती किंवा वडील हयात नसल्यास कोणाचा आधार क्रमांक द्यायचा, याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. याशिवाय गुगलवर बोगस वेबसाइट्समुळे महिलांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की ई-केवायसी प्रक्रिया सुरू असताना लाभाचा पैसा सुरूच राहील. मात्र ठरवलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे; अन्यथा लाभ बंद होण्याची शक्यता आहे.