Breaking

ladki bahin yojana : ‘सामाजिक न्याय’ चा निधी पुन्हा लाडक्या बहिणीसाठी वळवला

Decision made as soon as Ajit Pawar and Sanjay Shirsat met : अजित पवार आणि संजय शिरसाट यांची बैठक होताच निर्णय

Mumbai, : राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी वळवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पुन्हा सामाजिक न्याय खात्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, मंजूर आराखड्यानुसारच निधी वळवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे अनुसूचित जातींसाठीच्या योजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या आधीही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा एकत्रित 1,827 कोटींपेक्षा अधिक निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला होता. त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका केली होती.

Dattatray Bharane : शेतकऱ्यांना न्याय, नाविन्यपूर्ण शेतीला चालना, यासाठी प्रयत्न करणार

मात्र, या वेळी अजित पवार आणि शिरसाट यांची बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निधी वळवला गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शिरसाट यांचा आक्रमक पवित्रा कायम राहतो की ते शांत राहतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सामाजिक न्याय विभाग, जो मागास आणि वंचित घटकांसाठी न्याय देण्यासाठी कार्यरत असतो, त्याच्या निधीचा वापर इतर योजनेसाठी का केला जातो? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

Entry in Shinde group : तेजस ठाकरेसह 25 जणांचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्य सरकारने राखीपूर्वी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये एकरकमी जमा करण्याची तयारी सुरू केली आहे. या गिफ्टसाठी मोठा निधी उभा करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे आणि त्यामुळेच विविध खात्यांच्या योजनांना कात्री लागण्याची भीती व्यक्त होत आहे.