Ladki Bahin Yojana : १५०० रुपयांत बहीणी खुश आहेत का? ‘स्थानिक’ निवडणुकांत दिसेल..!

Vijay Vadettiwar said that Narahari Zirval should speak with understanding : भ्रष्टाचार संपवायचा असेल तर सुरुवात मंत्रालयातून करा

Nagpur : महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजना राज्यभर चर्चेचा विषय ठरली. राज्याच्या राजकारणात ही योजना गेम चेंजर ठरली. पण सद्यस्थितीत ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण निवडणुकीपूर्वी महायुतीने १५०० रुपये दिल्यानंतर सत्तेत आल्यास २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. महायुती सत्तेत आली, पण ती घोषणा हवेतच विरली. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे.

लाडक्या बहीणींना २१०० रुपये देऊ, असं कुणी बोललंच नव्हतं, असे वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं. त्यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना समज दिली. वडेट्टीवार म्हणाले, नरहरी झिरवळ सध्या मंत्री आहेत, त्यांनी समजून, सांभाळून बोललं पाहिजे. १५०० रुपयांत लाडक्या बहीणी खूष आहेत का, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कळेल. महागाई वाढवून १५०० रुपये दिले. २१०० रुपये देण्याचा विषय जाहिरनाम्यातही मांडला, पण दिले नाही. यावरून सरकारच्या नियतीत खोट आहे, हे स्पष्ट होते.

Pakistani citizen : शिंदे म्हणतात १०७ पाकिस्तानी सापडत नाही, तर फडणवीसांचा वेगळाच दावा !

राज्यात भ्रष्टाचाराला उत आला आहे. खालपासून ते वरपर्यंत पैसे दिल्याशिवाय प्रशासनातील एकही काम होत नाही. कमिशनखोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ज्या विभागातून कामे निघतात, तेथेही पैसे दिल्याशिवाय निधी वितरीत केला जात नाही. महाराष्ट्रात येवढा भ्रष्टाचार यापूर्वी कधीही नव्हता. हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर याची सुरुवात मंत्रालयापासून केली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Uddhav Thackeray : ‘ते’ घरातूनच निघत नाहीत, अन् निघालेच तर थेट परदेशात जातात !

गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपूरमध्ये हत्यासत्र सुरु आहे. येथे कायदा आणि सुव्यवस्थेतीची स्थिती गंभीर झाली आहे. वेळीच आवर घातला नाही, तर नागपुरात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. तिकडे २०० किलोमीटर आत घुसून दहशतवादी हल्ला करतात आणि चर्चा होते ती हिंदू – मुस्लीमची. देशाच्या सीमेवर ही स्थिती असेल तर स्थानिक पातळीवर अपेक्षा न केलेलीच बरी, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.