Breaking

Ladki Bahin : सभागृहात आज पुन्हा गाजली ‘लाडकी बहीण’

Aditi Tatkare’s information regarding the Ladki Bahin scheme : अदिती तटकरे म्हणाल्या, २१०० रुपयांबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील

Mumbai : महाराष्ट्र सरकारच्या योजनांपैकी ‘लाडकी बहीण’ योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली. येवढी की आजही ही योजना चर्चेत आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या योजनेवर ताशेरे ओढले. निवडणुकीपूर्वी घोषणा केल्याप्रमाणे लाडक्या बहीणींना २१०० रुपये सरकार देणार आहे की नाही, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आमदार पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना देण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा वापर फॉर्म भरण्यासाठी केला होता. प्रोत्साहन म्हणून ५० रुपये सरकार त्यांना देणार होते. हा आकडा मोठा आहे. ते पैसे त्यांना मिळालेले नाहीत. अधिवेशन संपेपर्यंत ते पैसे त्यांच्या खात्यात जम करणार का. ज्या महिलांना कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळतो, त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार का?

Dadarao keche : दादाराव केचेंना विधान परिषदेची लॉटरी?

सरकारने महिलांसाठी योजना आणली. कृषी सन्मान योजना ही केंद्र सरकारची आहे आणि लाडकी बहीण राज्य सरकारची. त्यामुळे या दोन योजना एकत्र न करता. अशा महिलांना दोन्ही योजनांचा लाभ द्यावा. लाडकी बहीण योजनेतून कृषी सन्मान योजनेच्या महिलांचे नाव वगळणार असाल तर त्यांचा वापर फक्त निवडणुकीपुरता केला का आणि घोषणेप्रमाणे लाडक्या बहीणींना २१०० रुपये देणार आहात की नाही, असा प्रश्न रोहित पवार यांनी केला.

ज्या वेळी योजना लागू केली. त्यावेळी ज्या अंगणवाडी सेविका पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील. त्यांना प्रोत्साहन राशी देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आत्तापर्यंत ३१ कोटीपेक्षा अधिक प्रोत्साहन रक्कम जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे जमा केली आहे. ३४ जिल्ह्यांपैकी २६पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ही रक्कम अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे, असे महिला व बालविकास मंत्री उत्तरादाखल म्हणाल्या.

Sanjay Rathod : चौकशीला का घाबरतात संजय राठोड ?

कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेसंदर्भात ज्या माता भगीणी शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत आहेत आणि ज्याची रक्कम १५०० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्या माता भगीणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार नाही, अशीही घोषणा केली होती. नमो शेतकरी योजनेमध्ये १००० रुपयांचा लाभ महिलांना मिळतो आहे. नमो शेतकरी मध्ये साडेपाच ते सहा लाख महिला आहेत. या महिलांनाही १५०० रुपये मिळावे, असा सरकारचा उद्देश होता आणि आहे.

Vijay Wadettiwar : शालेय पोषण आहारात सापडला मृत उंदीर!

या योजनेतून त्यांना वगळण्यात आले नाही. तर १००० नमो शेतकरी योजेतून आणि ५०० लाडकी बहीणी योजनेतून, असे १५०० रुपये त्यांनाही देण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. ऑक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहितेच्या आधी २ कोटी ३३ लाख ६४ हजार महिलांना लाभ दिला. तर फेब्रुवारी २०२५ मध्ये २ कोटी ४७ लाख महिलांना लाभ दिला. त्यामुळे लाडक्या बहीणींची फसवणूक होणार नाही, असे मंत्री तटकरे म्हणाल्या. २१०० रुपयांसंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.