व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative Council elections : काझी की सानंदा? विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच

Legislative Council elections : काझी की सानंदा? विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच

competition within Nationalist Congress Party NCP for a Legislative Council seat : ‘अनुभव विरुद्ध संघटन’ : विधानपरिषदेसाठी अजित पवार गटात नावांवर खल

Buldhana जिल्ह्यातील आगामी विधानपरिषदेच्या जागेवर अखेर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात या जागेसाठी पडद्यामागील हालचालींना वेग आला असून, इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या या शर्यतीत दोन नावे विशेष चर्चेत आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यातील संभाव्य स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दोन्ही नेत्यांची स्वतंत्र राजकीय ताकद आणि पक्षातील प्रभाव लक्षात घेता अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Akola Municipal Corporation: अकोला मनपात नगरसेवक निलंबनावरून राजकीय वातावरण तापले; संघर्ष केवळ सभागृहापुरता की राजकीय शक्तीपरीक्षेची नांदी?

नाझेर काझी यांनी गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अजित पवार गटाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संपर्क, पक्षविस्तार आणि संघटन सुदृढ करण्यामध्ये त्यांची भूमिका ठळक मानली जाते. त्यामुळे ‘संघटन निष्ठा’ या मुद्द्यावर त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा दीर्घ राजकीय अनुभव, मतदारसंघातील मजबूत संपर्क आणि प्रशासकीय जाण यामुळे त्यांचेही पारडे तितकेच वजनदार मानले जात आहे. विशेष म्हणजे, नुकतीच त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या नावाभोवतीच्या चर्चेला अधिकच बळ मिळाले आहे. या भेटीमुळे पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Amravati politics : अमरावतीत राजकीय ‘गौडबंगाल’? सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

यामुळे ही लढत आता ‘अनुभव विरुद्ध संघटन’ अशा स्वरूपात पाहिली जात असून, अंतिम निर्णय घेताना पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील सामाजिक, प्रादेशिक आणि आगामी राजकीय समीकरणांचा बारकाईने विचार करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी सुरू असलेली पडद्यामागील चुरस येत्या काही दिवसांत आणखी रंगण्याची चिन्हे असून, अखेर पक्षाची मोहर कुणाच्या नावावर उमटते, याकडे जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!