Police take action in Pusad against a truck leaving Hadapsar for Nagpur : हडपसरहुन नागपूरला निघालेल्या ट्रकवर पुसद मध्ये कारवाई
Pusad – Yavatmal : दारूची अवैधरित्या विक्री करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आणल्या गेलेल्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल (२४ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरसीपी पथकाने ६४ लाख ७२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विदेशी दारूच्या बॉक्सने भरलेला हा ट्रक पुण्याच्या हडपसर येथून निघाला होता आणि अवैद विक्री करण्यासाठी नागपूरला न जाता पुसद येथे आणण्यात आला होता.
धक्कादायक बाब म्हणजे ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे (वोर्डीकर) असे ठळक अक्षरात लिहीलेले होते. या ट्रकमधील काही बॉक्स दारूची अवैधरित्या हेराफेरी करून विक्री करत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. पुण्याच्या कोरेगाव येथे राहणाऱ्या मनीष ईश्वर सुरूळे, वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथे राहणाऱ्या प्रवीण दत्ता जिजोरे व महागाव तालुक्यातील तुळशी नगर येथे राहणाऱ्या रामेश्वर मधुकर पवार, सचिन उदल चव्हाण, सतीश श्रावण चव्हाण, गोकुळ बाबूसिंग चव्हाण व विक्रम बळीराम जाधव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Mahajan vs Khadse : गिरीश महाजन यांच्यामुळेच मुळेच मी भाजप सोडली
शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी नेमलेल्या आरसीपी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरनाळे यांना त्यांच्या खबऱ्यांकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती की, पुसद मध्ये हेराफेरी करण्याकरिता दारूने भरलेला ट्रक रात्रीच्या अंधारात येणार आहे. त्या माहितीच्या आधारे चार्ली पथकातील जमादार अभिजीत सांगळे, पंकज पातुरकर, उमेश राठोड ,पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार, पराग गिरनाळे, निलेश आडे, नरेश नरवाडे,गजानन जाधव, इरफान आगवानसह आदींनी माहूर रोडवरील एका लेआऊटमध्ये विदेशी कंपनीच्या दारूने भरलेला रात्रीच्या अंधारात ट्रक क्रमांक एमएच १२, वायबी ००४८ हा पेट्रोलिंग दरम्यान उभा दिसला होता. त्यानंतर पथकाने सापळा रचून छापा टाकला होता. छाप्यादरम्यान काही जण विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स काढताना आढळले.
Gulabrao Patil : जबाबदारी झटकत गुलाबराव पाटलांनी जखमेवर मीठ चोळले !
दारुने भरलेल्या एमएच १२ वाय बी ००४८ क्रमांकाच्या ट्रकवर ठळक अक्षरांमध्ये राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे (बोर्डीकर) नावाचा उल्लेख आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पकडलेल्या ट्रकची प्राथमिक चौकशी केली असता तो ट्रक राज्यमंत्र्याच्या चुलत भावाच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. दारूची वाहतूक करणारा ट्रक हडपसर येथून थेट नागपूरला जाणे अपेक्षित होते. परंतु तो ट्रक पुसद मार्गे जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्या ट्रकमधील काही दारू अवैधरित्या विकून व पुढे जाऊन चोरी झाल्याचं मालकाला सांगून डाव साधत असल्याची प्राथमिक माहिती शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्याकडून त्यांच्या प्राथमिक तपासादरम्यान मिळाली आहे. परंतु त्यांचा डाव पोलिसांनी हाणून पाडला.