Local body election : ‘अहंकारामुळे रावणाची लंका जळाली’ – एकनाथ शिंदे

eknath shinde vs devendra fadnavis election ravan lanka statement : लंका जाळतो म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा – फडणवीस

Mumbai : डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट आमनेसामने आले असून, या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांचे विधान राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘अहंकारामुळे रावणाची लंका जळाली’ असे वक्तव्य करून अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली, अशी चर्चा रंगली. या वक्तव्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूत जाऊन प्रत्युत्तर दिले, आणि त्यामुळे निवडणूक वातावरण आणखी तापले आहे.

डहाणूतील प्रचारसभेत शिंदे म्हणाले “डहाणूमध्ये आपण सर्वजण एकत्र आलेले आहात. एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र आलेला आहात. अहंकाराच्या विरोधात एकत्र आलेला आहात. रावणासारखा अहंकार होता, अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली. तुम्हाला दोन तारखेला तेच करायचं आहे.”

Pune land scam : अजित पवारांनी 24 तासात राजीनामा द्यावा,

या वक्तव्यानंतर शिंदे यांनी भाजपवर सूचक वार केला अशी राजकीय चर्चा सुरू झाली. डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटामध्ये थेट लढत असल्याने हे विधान अधिकच चर्चेत आले.

त्यानंतर आयोजित प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले “प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत आहे. अरे लंका तर हा पेटवणार आहे.” यानंतर कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले —
“कुणी म्हणत असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे… त्याकडे लक्ष देऊ नका. आपण लंकेत राहतच नाही. आपण रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे नाही.

Ajit Pawar : विकासावर भर देत म्हणाले “मी तो शब्द वापरायला नको होता”

फडणवीसांनी पुढे भरत राजपूत व इतर 28 उमेदवारांविषयी बोलताना मोठे परिवर्तन घडवण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. “नगरपालिका खुर्ची मिळवून झेंडा लावण्यासाठी नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी ही नगरपालिका हवी,” असे ते म्हणाले.

निवडणूक आता स्थानिक मुद्द्यांना मागे टाकत राजकीय प्रतिष्ठेची लढत बनली आहे. आगामी काही दिवसांत दोन्ही पक्षांकडून आणखी टोकाची वक्तव्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

___