nilesh rane sting operation nitesh rane reaction politics conflict : नितेश राणेंची प्रतिक्रिया, राणे बंधूंतील संघर्ष टोकाला
Mumbai: कोकणात राणे बंधूंचा राजकीय संघर्ष आता उघड टोकाला पोहोचला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये थेट भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केल्याने राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. या कारवाईत किनवडेकर यांच्या घरी अंदाजे 25 लाख रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम सापडल्याचा दावा निलेश राणेंनी केला. हिरव्या रंगाच्या पिशवीत ठेवलेली ही रक्कम सापडल्याचा दावा करत राणेंनी निवडणुकीसाठी पैशांचे वाटप सुरु असल्याचा आरोप केला आणि रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गात आल्यानंतर पैशांची बॅग पोहोचवण्याचे व्यवहार सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले.
पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई आणि मोहन सावंत यांच्याकडे पैशांच्या बॅगा जात असल्याचे नावेही त्यांनी घेतली. रवींद्र चव्हाण जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा संशयास्पद वातावरण तयार होते. या भेटीमागे राजकीय कारण स्पष्ट आहे, असा आरोपही निलेश राणेंनी केला.
Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीनंतर मविआमध्ये महाभूकंप!
या घटनेमुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले असून भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. त्यातच भाजपचे मंत्री आणि आमदार नितेश राणे जे निलेश राणेंचे सख्खे भाऊ आहेत यांनीही कठोर प्रतिक्रिया दिली आणि संघर्षाला अधिक हवा मिळाली. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना प्रत्येक जिल्ह्यात जाणे स्वाभाविक आहे. आम्ही उद्या मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल काही तरी बोलून एखाद्या घरात धिंगाणा घातला तर ते योग्य ठरणार आहे का? असा सवाल नितेश राणेंनी करत निलेश राणेंच्या वर्तनाची टीका केली.
Pune land scam : “आता माघार नाही”…घोटाळा हायकोर्टात नेण्याचा निर्धार !
घरात वैयक्तिक व्यवसायासाठी पैसे असतील तर त्यात चूक काय आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी स्वतःच्या पक्षाची बदनामी होऊ देणार नाही हे स्पष्ट केले. त्याचबरोबर “जो नियम आम्हाला लागू आहे तो सगळ्यांना लागू व्हायला हवा… हमाम में सब नंगे हैं” असे विधान करत नितेश राणेंनी निलेश राणेंच्या आरोपांना तोड दिली. कोकणातील राणे बंधूंच्या संघर्षाचा राजकीय पट आता स्पष्टपणे दोन गटात विभागला गेला आहे.
Local body election : निवडणूक कामावर नाही… निधीवर लढवली जातेय!
या पार्श्वभूमीवर युतीचा विषयही तापला. भाजपने युती केली नाही म्हणून नाराजी व्यक्त करत निलेश राणेंनी भाजपच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र त्यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणेंनी भाजपची प्रक्रिया स्पष्ट केली. स्थानिक स्तरावरची मतं घेऊन प्रस्ताव प्रदेशाकडे जातो, ही परंपरा आहे. आता युतीबाबत बोलण्याची वेळ संपली आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे युतीची चर्चा, पैशांचे वाटप, स्टिंग ऑपरेशन आणि कडव्या विधानांनी कोकणात राणे बंधूंचा संघर्ष अतिशय टोकदार वळणावर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकांमध्ये हा संघर्ष कशा रूपात प्रकट होणार आणि मतदार यावर कसे प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
___








