Local Body Election : रविवारी अर्ज स्वीकृती नाही; सोमवारी उमेदवारांची होणार धावपळ

Only Three Days Left for Filing Nominations : नामांकनासाठी उरला केवळ तीन दिवसांचा कालावधी

Buldhana जिल्ह्यातील ११ नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेला आता वेग आला असून गुरुवारच्या मुहूर्तावर उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नगराध्यक्षपदासाठी ५ आणि नगरसेवकांसाठी २८ अशा एकूण ३३ अर्जांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

सुरुवातीचे दोन दिवस अर्ज ‘झिरो’ होते. आता अचानक वाढलेल्या राजकीय हालचालींमुळे पक्षीय नेते, इच्छूक उमेदवार आणि अपक्षांची धावपळ वाढली आहे. १४ नोव्हेंबरपासून उमेदवारांच्या हाती फक्त ३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यातील रविवार, १६ नोव्हेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (१७ नोव्हेंबर) हा दिवस निर्णायक ठरणार आहे.

Local body election : निवडणुकांची घोषणा होताच सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले

इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तरी महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे दोन्ही आघाड्यांतील नाराजगिरी, तणाव आणि ‘स्वबळावर’ लढण्याची शक्यता वाढताना दिसते.

मेहकर नगर परिषदेसाठी शिंदे गटाने अजय उमाळकर यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केली असून त्यांनी नामांकनपत्रही दाखल केले आहे. इतर ठिकाणी मात्र अद्याप राजकीय चित्र धूसर आहे.

सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसीय आठवडा लागू केल्याने शनिवार-रविवार सुटी असते. मात्र निवडणुकीसाठी शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी अर्ज प्रक्रिया सुरू राहणार, पण रविवारी बंद राहील. सोमवारी अर्जासाठी प्रचंड गर्दी अपेक्षित असून पक्ष नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

चिखली : प्रभाग क्रमांक ३ मधील अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी प्रतिभा छोटू कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऑनलाइन अर्जानंतर ऑफलाइन अर्जही निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

Delhi blast case : कारब्लास्टचा मुख्य आरोपी उमर मोहम्मदचे घर केले उद्ध्वस्त !

आतापर्यंत मिळालेल्या अर्जांचे एकत्रित चित्र
नगरपालिका अध्यक्ष सदस्य एकूण
बुलढाणा – ३ ३
चिखली १ ८ ९
लोणार १ – १
मलकापूर – ६ ६
मेहकर २ ८ १०
नांदुरा १ १ २
शेगाव – ६ ६
सिंदखेड राजा – १ १
एकूण ५ ३३ ३८

नामांकनाची अंतिम मुदत समोर असताना विविध पक्षांच्या अंतर्गत चर्चेला वेग आला आहे. उमेदवारांची अधिकृत घोषणा, बंडखोरीचा सूर आणि संभाव्य आघाड्यांचे समीकरण — हे सर्व सोमवारीपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.