Local body election : शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला धक्का

shivsena shinde group shock to bjp defection local elections updates : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घडामोडींना वेग

Thane : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी तुफान सुरू आहे. बहुतेक ठिकाणी भाजपकडे इनकमिंगचा मोठा ओघ असून अनेक नेते व कार्यकर्ते कमळाच्या छत्राखाली प्रवेश करत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर मोठा उलटफेर घडला असून शिवसेना शिंदे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. विशेष म्हणजे ही घडामोड एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अंबरनाथमध्ये घडली आहे.

अंबरनाथमध्ये भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. रोझलिन फर्नांडिस यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाचे नेते अरविंद वाळेकर यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिंदे गटाकडून भाजपवर थेट इशारा देण्यात आला “तुम्ही आमचे कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही उत्तर द्यायला येतं. जशास तसे उत्तर देऊच.”

Pune land scam : अजित पवारांनी 24 तासात राजीनामा द्यावा,

ऐन निवडणूक काळात झालेल्या या प्रवेशामुळे अंबरनाथमधील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. राज्यात 2 डिसेंबरला मतदान असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगमुळे सर्वाधिक नुकसान शिंदे गटाला होत असल्याचे चित्र आहे.

त्या मुद्द्यावरून खासदार नरेश मस्के, मंत्री शहाजी बापू आणि इतर नेत्यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
शिंदे गटातील वाढत्या असंतोषामुळे एका टप्प्यावर काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरही बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता स्पष्ट होती.

Ajit Pawar : विकासावर भर देत म्हणाले “मी तो शब्द वापरायला नको होता”

मात्र आता परिस्थितीत मोठे समीकरणीय उलटफेर दिसून येत आहे.भाजपकडून इनकमिंग सुरू असताना अचानक अंबरनाथमधील भाजपमधून आउटगोइंग होऊन शिंदे गटात थेट प्रवेश झाला. निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी धक्का शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे.

_____