The plan is set, now start preparing – Chandrakant Patil : प्लॅन ठरला, आता तयारीला लागा – चंद्रकांत पाटील
Kolhapur : “दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल आणि अखेर महानगरपालिका निवडणुका होणारच आहेत,” असा दावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपच्या ‘विजयी संकल्प मेळाव्यात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीचा कानमंत्र दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभेपेक्षा खरी नेत्याची निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका. या निवडणुका लोकशाहीतील सर्वात महत्त्वाच्या आहेत. कदाचित जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधीही होईल. दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे आपण आता निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Kadam Vs Parab : रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “2019 मध्ये ज्यांचे तिकीट नाकारले गेले, त्या बावनकुळेंना आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार दिले गेले आहेत. निवडणूक म्हणजे फास्ट ट्रेन आहे, प्लॅटफॉर्मवर जो राहील तो राहील. मात्र, कोणीही नाराज होऊ नये. राजकारणात प्रयत्नाबरोबर थोडं नशीबही लागतं.”
“महायुती आणि महाविकास आघाडीत फरक दिसला पाहिजे. 2017 ची परिस्थिती बदला. येणाऱ्या दिवाळीचा फायदा घेऊन लोकांशी संवाद वाढवा. निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची आहे, पण शेवटचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
internal dispute : शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या जिल्हाप्रमुख भावावर हल्ला!
ते पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आमचा उमेदवार चांगला असेल, तर आम्ही मैत्रीत लढू. मात्र, कार्यकर्त्यांचा बळी देऊन नाही. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही,” असा निर्धार पाटील यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी 2019 च्या राजकीय घटनांवर भाष्य करताना म्हटलं, “2019 साली उद्धव ठाकरे यांनी थोडं समजूतदारपण दाखवलं असतं, तर आज त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गरज भासली नसती. पण नियती ही नियतीच असते. सरकार जाणं हा नियतीचा खेळ होता. त्यांनी जे केलं त्यातून काय मिळवलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Vanchit Bahujan Aghadi : रुग्णांची लुट थांबवा, नाहीतर तोडफोड आंदोलन
“उतू नको, मातू नको, घेतलेला वसा सोडू नको. निवडणुका जातील, येतील, पण पार्टीसाठी काम सुरूच ठेवलं पाहिजे. मी कधीच तिकीट मागितलं नाही. नेत्याची इच्छा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आज्ञा,” असं चंद्रकांतदादांनी सांगितलं.
यासह चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं असून, त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा निवडणुकांच्या चर्चेला उधाण आलं आहे.
____








