Local body election : मतदारांना ५० टक्के सवलतींचं आमिष;

A unique experiment in the backdrop of the municipal elections! : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनोखा ‘प्रयोग’!

Pune: inपिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुका जवळ आल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध शक्कली लढवल्या जात आहेत. वाढत्या महागाईच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभनांची मालिका सुरू झाली असून, प्रभाग क्रमांक 23 मध्ये उमेदवारीची इच्छा असलेल्या कांचन अमोल जावळे यांनी मतदारांना 50 टक्के सवलतीत गृहउपयोगी वस्तू देण्याची रणनीती अवलंबल्याने मोठी चर्चा रंगली आहे.

कांचन जावळे यांना भाजपकडून तिकीट मिळावे, आणि त्या तिकीटावरून नगरसेवक होण्याचे त्यांचे ध्येय साध्य व्हावे, यासाठी मतदारांशी संपर्क वाढवण्याचा हा उपक्रम राबवला जात असल्याचे दिसत आहे. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर, गिझर, पिठाची गिरणी, सायकली अशा अनेक वस्तू अर्ध्या किमतीत देत मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. महागाईच्या काळात कमी दरात वस्तू मिळत असल्याने नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत आहेत.

Udaynagar Grampanchayat : उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर अपात्र घोषित

या उपक्रमाबाबत कांचन जावळे यांचे पती अमोल जावळे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा उपक्रम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना महागाईत दिलासा देण्यासाठी आहे. रोजच्या जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू येथे उपलब्ध असून लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 200 हून अधिक जणांनी बुकिंग केले असून रोज शंभर सायकलींची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमोल जावळे यांनी पुढे सांगितले की, आमदार शंकर जगताप यांनी त्यांना कामाला लागण्याचे आश्वासन दिले असून केलेल्या कामाच्या जोरावर तिकीट निश्चित मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र या ‘सवलतीच्या उपक्रमामुळे’ मतदारांवर प्रभाव पडत असला तरी निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या आमिषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Zilla Parishad School : पालकांचा उद्रेक, शाळेला ठोकले कुलूप!

महापालिका निवडणुकांच्या उंबरठ्यावर सुरू झालेल्या या ‘५० टक्के सवलत अभियानामुळे’ पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.