13 polling stations in the city declared ‘sensitive’ : शहरातील १३ मतदान केंद्रे ‘संवेदनशील’, मतदान व मतमोजणीसाठी पालिका प्रशासन सज्ज
Chikhli चिखली नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानासंदर्भात संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पोळ व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत बिडगर यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदान ते मतमोजणीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
५६०६८ मतदार ठरवणार ‘नगराध्यक्ष व २८ नगरसेवकांचे’ भविष्य
एकूण १४ प्रभागांमधून २८ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार—
एकूण लोकसंख्या : 59,044
अनुसूचित जाती : 9,651
अनुसूचित जमाती : 515
अंतिम मतदार यादीप्रमाणे —
पुरुष मतदार : 28,070
महिला मतदार : 27,998
एकूण मतदार : 56,068
Local Body Elections : प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, मैदान मारण्यासाठी आटापीटा
मतदान केंद्रे, सुविधा आणि व्यवस्थेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी पोळ यांनी सविस्तर माहिती दिली.
EVM ची यंत्रणा कशी असेल?
नगराध्यक्ष पदासाठी:
१ नियंत्रण युनिट + १ मतदान युनिट
प्रभाग 1 ते 9 व 11 ते 14 (अध्यक्ष अ व ब सदस्य):
प्रत्येकी १ नियंत्रण युनिट + १ मतदान युनिट
प्रभाग 10:
१ नियंत्रण युनिट + २ मतदान युनिट
यामुळे मतदान सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक सर्व साधनांची तयारी पूर्ण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
३ डिसेंबर : तालुका क्रीडा संकुलात मतमोजणी
मतमोजणीसाठी ३ डिसेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल इमारत निवडण्यात आली आहे.
एकूण ७ टेबलवर मतमोजणी
राखीवसह 105 अधिकारी-कर्मचारी नियुक्त
संपूर्ण प्रक्रिया पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही निगराणीखाली होणार आहे.
Local Body Elections : अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये ‘त्या’ वर्षाची मतदार यादीच नाही
एकूण ६१ मतदान केंद्रांपैकी १३ केंद्रे राजकीय व जातीय दृष्ट्या संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. महिला सक्षमीकरणासाठी प्रभाग क्र. 7 मधील राजाभाऊ बोंद्रे न.प. उर्दू विद्यालयातील केंद्र क्र. 3 हे आदर्श महिला मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. ‘पर्दानशिन’ महिला मतदारांच्या ओळख पटवणीसाठी २२ महिला कर्मचारी नेमले आहेत.
मतदान प्रक्रियेच्या सुरळीततेसाठी एकूण ५८८ कर्मचारी दिवसभर कार्यरत असतील. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी ५१ केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी मतदान चिठ्ठ्या वाटत आहेत. ९ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त आहेत, त्यापैकी ७ अधिकाऱ्यांवर प्रत्येकी दोन प्रभागांची जबाबदारी आहे. तर २ अधिकारी राखीव आहेत.








