16 seats reserved for OBCs in Amravati ZP : २२ ऑगस्टनंतर आरक्षण होणार जाहीर, राजकीय हालचालींना वेग
Amravati सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावरील याचिका फेटाळल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील ५९ गटांसाठी लवकरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
या सभागृहात ३० महिला व २९ पुरुष सदस्य प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यापैकी ओबीसी प्रवर्गासाठी १६ जागा राखीव राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण असणार आहे. मात्र अंतिम चित्र २२ ऑगस्टनंतरच स्पष्ट होईल, कारण त्या दिवशी प्रभागरचना आणि आरक्षणाची घोषणा होणार आहे. प्रभागरचना आणि आरक्षणाची अंतिम घोषणा २२ ऑगस्टनंतर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार तयारीत असले तरी प्रत्येक गटाचे आरक्षण निश्चित होईपर्यंत उमेदवारीबाबत अनिश्चितता कायम राहणार आहे.
Prataprao Jadhav : ‘राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला होता’; प्रतापराव जाधवांची टीका
सध्याचे अंदाज – कोणासाठी किती जागा?
ओबीसी प्रवर्ग : १६ जागा (८ महिला, ८ पुरुष)
अनुसूचित जाती (SC) : १२ जागा (६ महिला, ६ पुरुष)
अनुसूचित जमाती (ST) : ११ जागा (६ महिला, ५ पुरुष)
खुला प्रवर्ग : २० जागा (१० महिला, १० पुरुष)








