A rapid review of the municipal election preparations : 15 ते 20 डिसेंबरदरम्यान आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
Akola राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा आढावा राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी घेतला. या बैठकीत अकोला महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या हरकती व आक्षेपांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व हरकती १० डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी दिली.
राज्यातील २९ महापालिकांचा कार्यकाळ चार वर्षांपूर्वीच संपला आहे. मतदार यादीची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर सुरू असून, २२ डिसेंबर २०२५ पर्यंत अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यानंतर आदर्श आचारसंहिता १५ ते २० डिसेंबरदरम्यान लागू होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Repo rate : गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांसाठी दिलासादायक निर्णय
महापालिका प्रशासनाने निवडणूक तयारीस सुरुवात केली असून, निवडणूक विभागाने संबंधित कामकाज सुरू केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेत महापालिकानिहाय आढावा केला.
दरम्यान, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया बहुतांश ठिकाणी पूर्ण झाली असून, काही ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान, तर २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होण्याची शक्यता असताना, आता महापालिका निवडणुकांची घोषणाही जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत.
Local Body Elections : मार खाण्यापासून वाचविणे, हा पळवून लावण्याचा उद्देश
प्रारूप मतदार यादीवरील हरकतींचे निपटारे व अंतिम प्रभागनिहाय यादी १० डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित होईल. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित होईल. तर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२५ला प्रकाशित होईल.








