A third-front option for the municipal corporation election : भाजपचे माजी नगरसेवक सक्रिय, आघाडीची ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिका
Akola विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतील बंडखोरांनी स्वतंत्र तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही बंडखोर नेते इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधत असून, शहरातील हॉटेल्समध्ये सध्या बैठकींचे सत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ही आघाडी प्रत्यक्षात आकार घेते का, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये युती जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना जनसंपर्क, कार्यक्रमांना उपस्थिती आणि प्रभागनिहाय संघटन याबाबत तयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Local Body Elections : चिखलदरा नगरपरिषदेतील निवडणूक बिनविरोध
कार्यकर्त्यांनी लग्नसोहळे, वाढदिवस, सामाजिक कार्यक्रमांसह नागरिकांशी थेट संपर्क वाढविला असून, निवडणुकीसाठीचे वातावरण निर्माण करण्याचे काम गतीमान झाले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या महाविकास आघाडीतील पक्षांनी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संभ्रमावस्था कायम असून, आघाडीबाबतचा निर्णय कधी घेतला जाईल, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
Local Body Elections : चिखलदऱ्यात फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध !
महापालिका निवडणुकीसाठी ‘फिक्स’ मानले जाणारे भाजपचे माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांना पक्षश्रेष्ठींनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचे समजते. त्यानुसार त्यांनी प्रभागातील कामांची गती वाढविली असून, नागरिकांच्या समस्या–तक्रारींचे निवारण करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. प्रभागातच अधिक वेळ घालवून नेटवर्क मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महापालिका निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरू लागली आहे. बंडखोरांच्या या नव्या आघाडीचे प्रयत्न कितपत यशस्वी ठरतात आणि ती खरोखरच रिंगणात उतरते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घडामोडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे.








