Amravati Zilla Parishad group structure to be changed : ५९ जागांची नवी रचना; एससी – ११, एसटी – १२, नामाप्र – १६ जागा आरक्षित
Amravati आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून जिल्ह्यातील गट रचनेत लवकरच बदल होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जाहीर होणार असून काही गटांमध्ये अदलाबदल होणार आहे. कुठे गट वाढणार, तर काही ठिकाणी गट कमीही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०२५ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी २०१७ चेच सूत्र वापरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सूत्रानुसार मतदारसंघांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवण्यात येत आहे. परिणामी, अचलपूर तालुक्यात एक गट वाढणार आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील एक गट वगळला जाणार आहे.
५९ गटांपैकी आरक्षणाचे स्वरूप खालीलप्रमाणे :
प्रवर्ग जागा संख्या
अनुसूचित जाती (एससी) ११
अनुसूचित जमाती (एसटी) १२
नामनिर्दिष्ट मागास प्रवर्ग (नामाप्र) १६
सर्वसाधारण २०
एकूण ५९
Vikas Thakre : आता ब्रजेश दिक्षितांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे !
यापैकी ३० जागा महिला आरक्षणासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तर नामाप्रमध्ये ओबीसी, व्हीजेएनटी आदींचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघातील आरक्षण ठरवण्यासाठी ५९ मतदारसंघांचे अंतिम परिसीमन आवश्यक आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच कोणत्या मतदारसंघात कोणते आरक्षण असेल, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कसे ठरते मतदारसंघाचे प्रमाण?
राज्य निवडणूक आयोगाने गट रचना ठरवण्यासाठी खालील सूत्र निश्चित केले आहे. अचलपूर तालुक्याचा वाटा ५.६१% झाला असून त्याला अतिरिक्त गट मिळणार आहे. चांदूर रेल्वेचा वाटा २.५२% असून त्याचा एक गट कमी होणार आहे.