BJP and Congress face-to-face in Malkapur : मलकापूरमध्ये भाजप-काँग्रेस आमने-सामने, खामगावमध्ये काहींना डच्चू
Khamgao नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. काही पक्षांनी अधिकृत उमेदवारही जाहीर केले आहेत. मात्र, मात्र, घाटाखालील खामगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर आणि शेगाव येथे पक्षांतर्गत चर्चेनंतर काही इच्छुकांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. आज बहुतेक पक्षांकडून एबी फॉर्मचे वितरण सुरू होणार असल्याने सर्वच नगरपालिका कार्यालयांत प्रचंड गर्दी अपेक्षित आहे.
जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठीची निवडणूक प्रक्रिया वेगात सुरू असून, घाटाखालील पाच नगर परिषदांमध्ये इच्छुकांची धावपळ चरमसीमेवर आहे. आजचा दिवस शेवटचा असल्याने उमेदवार, समर्थक आणि पक्षाकडून वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Local Body Elections : लोणारच्या कर्मचाऱ्यांना ‘फुल सर्व्हिस’, मेहकरचे मात्र उपाशीपोटी!
मलकापूर : भाजप–काँग्रेस आमनेसामने?
मलकापूरमध्ये रविवारी उशिरापर्यंत राजकीय हालचालींना वेग आला. युती–आघाडीचे चित्र स्पष्ट न झाल्याने येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. उमेदवारांची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. आजपर्यंत १३७ अर्ज दाखल झाले असून, मलकापूरमध्ये स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार आहे.
खामगाव : भाजपकडून एबी फॉर्म; ७–८ विद्यमान नगरसेवकांना डच्चू?
खामगाव नगर परिषदेसाठी आतापर्यंत २६ अर्ज दाखल झाले आहेत. भाजपकडून आज सकाळी एबी फॉर्मचे वितरण करण्यात येणार असून, ७ ते ८ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काही नगरसेवकांनी स्वेच्छेने माघार घेतल्याचेही सांगितले जात आहे.
जळगाव जामोद : महाआघाडीत नगराध्यक्षपदावरच पेच
येथे रविवारपर्यंत २१ अर्ज, त्यापैकी ४ नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाले आहेत. भाजप स्वतंत्र लढणार असली तरी मित्रपक्षांना काही जागा देण्याची शक्यता व्यक्त होते. महाविकास आघाडीत मात्र नगराध्यक्ष पदासाठी प्रचंड चढाओढ असून एकमत होताना दिसत नाही.
नांदुरा : ‘एकडे गट’ स्वतंत्र आघाडीच्या तयारीत?
नांदुरा नगर परिषद निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असून माजी आमदार राजेश एकडे ‘नगरविकास आघाडी’च्या माध्यमातून स्वत:ची आघाडी उभारण्याच्या तयारीत आहेत.
शेगाव : सत्ता हस्तगत करण्यासाठी महाआघाडी सक्रिय
भाजपच्या ताब्यातील शेगाव नगर परिषद परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील यात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप–शिंदेसेना युती अधिकृत झाल्याने येथे सामना रंगतदार होणार आहे.
Political sensitivity : ‘माणुसकीची भिंत’ उभारणाऱ्या डॉ. भुसारींसाठी एकवटले सर्वपक्षीय नेते
नामांकनाचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार, समर्थक व पक्षनेते यांच्या हालचालींना वेग आला आहे. एबी फॉर्म कोणाला? कोणाला नकार? कोण शेवटच्या मिनिटाला अर्ज भरणार? याबाबत शहरात चर्चांचा पूर आला आहे. आजच्या दिवसात नगरपालिका कार्यालये ‘राजकीय रणांगण’ बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








