Local Body Elections : निर्णय लांबणीवर, इच्छुकांची वाढली चिंता!

Confusion among the aspirants continued as the court decision delayed : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा संभ्रम कायम

Washim स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती. मात्र कोणताही निर्णय न झाल्याने निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या इच्छुकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आता ही सुनावणी मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, पुन्हा पुढची तारीख मिळाली तर उन्हाळ्यानंतरच निर्णयाची शक्यता आहे. कारण दरम्यानच्या काळात न्यायालयाला उन्हाळ्याच्या सुट्या आहेत.

Prashant Koratkar : कोरटकरच्या घरापुढे आंदोलन; अडचणी वाढल्या!

वाशिम जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ १६ जानेवारी २०२५ रोजीच संपला आहे. १७ जानेवारीपासून प्रशासक राज लागू आहे. जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांवरही प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. नियमानुसार, जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक असते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेचा निकाल न लागल्याने निवडणुका अद्याप लांबणीवर पडत आहेत.

पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघातील जनसंपर्क वाढवला आहे. मात्र, निवडणूक कधी होणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींची परिस्थितीही अशीच आहे.

Agitation on Gram Panchayat : तब्बल पाच वर्षांपासून पाणीटंचाई, ग्रामस्थ त्रासले !

निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी काही महत्त्वाचे टप्पे पूर्ण करावे लागतील. मतदार यादी अद्ययावत करणे. जिल्हा परिषद, पंचायत समिती गट आणि गणांचे आरक्षण निश्चित करणे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार असल्याने निवडणुका मे अखेरीस होण्याची शक्यता आहे. मात्र, आणखी विलंब झाल्यास पावसाळी पेरणीच्या हंगामामुळे निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी इच्छुकांसह सर्व नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीची प्रतीक्षा आहे. निवडणुकीबाबतचा निर्णय लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.