Congress has appointed ward-wise observers : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक
Amravati आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. काँग्रेस भवन येथे अमरावती व बडनेरा विधानसभा प्रभारी डॉ. झिशान हुसैन यांच्या उपस्थितीत अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीत निवडणूक रणनीती आखण्यात आली आणि प्रभागनिहाय निरीक्षकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
बैठकीला खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, प्रदेश महासचिव किशोर बोरकर, प्रदेश सचिव आसिफ तवक्कल, माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार, प्रदेश सचिव नजीर खान बी. के., महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अब्दुल रफीक, प्रदेश महासचिव नसीम खान पप्पू, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव फिरोज शाह, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
Local Body Elections : काँग्रेसच्या सात मोहऱ्यांच्या हाती पक्षाचं भवितव्य!
या बैठकीत शहरातील अनेक नागरिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकांत प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभागस्तरावर सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
नियुक्त झालेले निरीक्षक :
प्रभाग १, २, ३ – अविनाश पांडे
प्रभाग ५ – राजेश ऊर्फ बबलू देशमुख
प्रभाग ७ – कोमल बोथरा
प्रभाग ७ व १८ – विनोद मोदी
प्रभाग ९ – अशोक डोंगरे
प्रभाग १०, ११ – किशोर बोरकर
प्रभाग १४, १७, १९ – संजय वाघ
प्रभाग २० – नाना बारबुद्धे, नेमराज देशमुख
प्रभाग २१ – मोहम्मद साबीर
प्रभाग २२ – सुरेश इंगळे








