Local Body Elections : मलकापूर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान

Congress’s Atikur Rahman elected as Mayor of Malkapur : काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक

Malkapur मलकापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी झाले आहेत. नगरपरिषदेत एकूण ३० सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना (उबाठा)चा १, अपक्ष २ आणि एमआयएमचे ३ सदस्य निवडून आले आहेत.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अतिकुर रहमान शाफिकूर रहमान यांनी २३,६१४ मते मिळवून विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक १ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला महादेव डोफे यांनी ९४३ मते, प्रभाग २ अ मधून भाजपचे हेमंत रिंढे यांनी १३७९ मते मिळवून सदस्यपद पटकावले. प्रभाग ३ अ मधून काँग्रेसच्या मिनाक्षी मोहन पाचपांडे ७८१ मते, प्रभाग ४ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चव्हाण अ. हबीब अ. सत्तार १०७४ मते मिळवून विजय मिळवला. प्रभाग ५ अ मधून काँग्रेसच्या शमा बानो सैय्यद सलीम १५८६ मते तर प्रभाग ६ ब मधून काँग्रेसचे रईस खान रशीद खान जमादार १७२७ मते मिळवून विजयी झाले.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांचा गड कायम, प्रहारचा वरचष्मा

प्रभाग ७ अ मधून काँग्रेसच्या सायमा खानम जमील खान जमादार १५३२ मते, प्रभाग ८ अ मधून एमआयएमच्या असमत अंजुम अब्दुल कहार १७४० मते, प्रभाग ९ अ मधून एमआयएमच्या शकीला बी असतउल्लाशाह १२०० मते मिळवून सदस्यपद मिळवले. प्रभाग १० अ मधून अपक्ष उमेदवार शेख नाजीम शेख करीम १३३७ मते मिळवून विजयी झाले.

Local Body Elections : बदललेल्या राजकीय समीकरणाचा भाजपला फायदा

प्रभाग ११ अ मधून काँग्रेसच्या शबाना परवीन साजीद अहेमद खान १४६६ मते, प्रभाग १२ अ मधून भाजपच्या जयश्री संतोष बोंबटकार ११५० मते, प्रभाग १३ अ मधून काँग्रेसच्या आयेशा मोहम्मद जाकीर १४६९ मते मिळवत विजय संपादन केला. प्रभाग १४ ब मधून भाजपच्या हेमलता ब्रिजलाल मधवानी ११६७ मते, प्रभाग १५ अ मधून भाजपच्या माधुरी सोनाजी खर्चे १११५ मते मिळवून सदस्यपद मिळवले आहे.