Corporation elections will be held with four-member ward system : प्रभाग रचना सुरू करण्याचे नगर विकास विभागाचे आदेश; २२ व २० प्रभाग निश्चित
Akola Amravati सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश मिळाले आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने हालचाली सुरु करत अकोला आणि अमरावती महानगरपालिकांची प्रभाग रचना चार सदस्यीय प्रणालीने करण्याचे आदेश नगर विकास विभागाने मंगळवारी जारी केले आहेत.
यामुळे दोन्ही महापालिकांची आगामी निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५ नुसार, प्रभाग रचना करताना संबंधित शहरांची २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्या, त्यातील अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या, तसेच भौगोलिक सलगता यांचा विचार केला जाणार आहे.
Sandip Joshi : महापालिकेची निवडणूक भाजपर एकतर्फी जिंकणार, संदीप जोशींचा दावा
अमरावती महानगरपालिकेची सदस्य संख्या ८७ तर अकोला महानगरपालिकेची ८० इतकी निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यसंख्येनुसार अमरावतीत २२ प्रभाग, तर अकोलात २० प्रभाग तयार केले जाणार आहेत. एका प्रभागात सदस्य संख्या किमान तीन आणि कमाल पाच इतकी असावी, अशी अट आहे.
नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा आदेश धडकल्याने निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. नगर परिषद द्विसदस्यीय प्रभागानुसार, तर नगरपंचायतचे एक सदस्यीय प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश मंगळवार, १० जून रोजी नगर विकास विभागाने राज्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
Dnyaneshwar Dhane Patil : दोनवेळा आमदार होते, आता ठाकरेंची साथ सोडली
प्रभाग रचनेचे टप्पे :
1. प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे
2. प्रारूप रचना राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठवणे
3. प्रारूप रचनेस निवडणूक आयोगाची मान्यता घेणे
4. ती प्रभाग रचना प्रसिद्ध करणे
5. नागरिकांकडून हरकती व सूचना मागवणे
6. त्या हरकतींवर सुनावणी घेणे
7. सुनावणी अहवालासह अंतिम प्रभाग रचना आयोगाकडे सादर करणे
8. अंतिम मंजुरीनंतर ती रचना जाहीर करणे
भविष्यातील निवडणुकांसाठी ही पायाभूत प्रक्रिया ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या गैरसोयी टाळून रचना करावी लागणार आहे.








