Development’ is the focal point of democracy in Ballapur : मतदारांमध्ये जात–पात पलीकडे जाऊन सर्वांगीण प्रगतीची अपेक्षा; काँग्रेसमध्ये तीव्र दुफळी उफाळून आली वर
Ballarpur – Chandrapur : बल्लारपूर विधानसभा परिसरात सुरू असलेल्या राजकीय हालचालींनी निवडणुकीचे वातावरण तापले आहे. यावेळी मतदारांचा कल पारंपरिक जात–पात, गट–तटबाजी किंवा पक्षनिष्ठेपेक्षा विकासाच्या मुद्द्यावर ठामपणे केंद्रित झाल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही वर्षांतील स्थानिक पायाभूत सुविधांचा विस्तार, रोजगारनिर्मिती आणि पूर्ण प्रकल्पांची संख्या लक्षात घेता, मतदार विकासाकडे झुकत आहेत.
स्थानिक नागरीकांमध्ये एक वेगळा उत्साह जाणवत असून, “यावेळी मतदान फक्त आणि फक्त बल्लारपूरचा सर्वांगीण विकास कोण करणार?” या प्रश्नावर चर्चा होत आहे. मतदारांमध्ये जाणवणारा हा बदल राजकीय समीकरणांना नव्या दिशेने नेणारा ठरत असून, उमेदवारांवर अधिक जबाबदारी टाकत आहे. बल्लारपूर मतदार संघात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी असंख्य विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांचा थेट फायदा भाजपा उमेदवारांना होईल. हे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये मात्र प्रचंड दुफळी आणि अंतर्गत असंतोष उफाळून वर आल्याने पक्षाच्या प्रचारयंत्रणेवर मोठा परिणाम झाला आहे. स्थानिक नेतृत्वात समन्वयाचा अभाव, तिकीट वाटपातील नाराजी, तसेच काही काँग्रेस नेत्यांनी उघडपणे व्यक्त केलेल असंतोष यामुळे काँग्रेसच्या मतदारांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये विभागणी झाल्याने पक्षाला बलकट मोहीम उभी करण्यास अडथळे येत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, काँग्रेसमधील ही कलहस्थिती प्रतिस्पर्धी पक्षांसाठी मोठा फायदा ठरू शकते. भाजप योजनेनुसार ‘विकास’ या मुख्य मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यातच काँग्रेसमधील एकसंध नेतृत्वाचा अभाव त्यांच्या प्रचारालाच नव्हे तर मतदारांच्या मनातही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो आहे.
Sharad Pawar : काँग्रेसला नकार, ठाकरे-मनसेसोबत युतीचे संकेत !
दुसरीकडे, मतदार मात्र आपल्या अपेक्षा स्पष्टपणे मांडत आहेत. रस्ते, पाणी, आरोग्यसुविधा, औद्योगिक गुंतवणूक आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती हे मुख्य मुद्दे ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देणारा आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणारा प्रतिनिधी हवा, अशी भूमिका मतदारांमध्ये दिसते.
एकूणच, या निवडणुकीत बल्लारपूरचा राजकीय पट बदलताना दिसत आहे. अंतर्गत कलहाने ग्रासलेल्या काँग्रेससमोर आव्हाने वाढली असताना, मतदारांनी विकासाला प्राधान्य दिल्यामुळे संपूर्ण समीकरण नव्या दिशेने वळत आहे.
एकंदरीत, बल्लारपूर नगरपरिषद निवडणूक ही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आजवर केलेल्या विकासामुळे स्थानिक मतदार विकासाच्या बाजूने उभा आहे. काँग्रेसची बल्लारपूर स्थिती फारच बिकट दिसत असून येणाऱ्या निवडणुकीत वनसाइड भाजपा येण्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. शेवटी मतदार विकासाकडे जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.








