Direct contest between BJP and Vanchit; Congress struggling for survival : मूर्तीजापूरमध्ये त्रिशंकुची शक्यता, नगरपालिका निवडणुकीत संमिश्र यशाचे चित्र
Akola नगरपालिका निवडणुकांत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकीकडे स्थानिक घडामोडींमुळे भाजप व वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे परंपरागत मतदार दुरावत असल्याने काँग्रेसला अनेक नगरपालिकांमध्ये आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे स्थानिक राजकीय तज्ज्ञांचे अनुमान आहे.
स्थानिक परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्याचा थेट फायदा वंचित बहुजन आघाडीलाच होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. भाजप दुसरा सर्वात प्रभावी पक्ष म्हणून उदयास येईल, तर काँग्रेसकडे फारसा पर्याय उरणार नाही. बाळापूर व बार्शीटाकळी वगळता इतर नगरपालिकांमध्ये मुस्लिम बहुल वार्डांतील काही मोजक्या जागांपलीकडे काँग्रेसला भरीव यश मिळण्याची शक्यता कमी आहे.
Krantikari Shetkari Sanghatna : २१ हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित
तज्ज्ञांच्या मते, बहुतेक नगराध्यक्षपदे भाजपकडे जाण्याची परिस्थिती सध्या तरी दृश्यमान आहे. युतीतील घटक पक्ष वेगळे लढत असल्याचा फायदा भाजपला अधिक होण्याची शक्यता आहे. अकोट आणि तेल्हारा या दोन्ही नगरपालिका या निवडणुकीतही भाजपकडेच राहतील, अशी स्थानिक पातळीवरील हालचालींवरून स्पष्ट संकेत मिळत आहेत. बाळापूरमध्ये खतीब यांच्याकडे सत्ता कायम राहण्याचेही संकेत आहेत.
मूर्तिजापूर शहरात या वेळेस त्रिशंकू स्थिती उद्भवू शकते. अशाही परिस्थितीत नगराध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आमदार हरीष पिंपळे यांनी निवडणुकीत फारसा रस दाखवला नसल्याने येथे भाजपसाठी स्पर्धा वाढली आहे.
हिवरखेड येथे प्रथमच नगर परिषदेची निवडणूक होत आहे. काँग्रेसकडे या निवडणुकीत येथे सत्ता मिळविण्याची खऱ्या अर्थाने संधी होती. मात्र, स्थानिक पातळीवरील काही महत्त्वाच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणी पाठ फिरवल्याने काँग्रेसची गणिते बिघडली. त्यामुळे येथे मुख्य लढत भाजप व वंचित बहुजन आघाडी यांच्यातच राहणार असून, नगराध्यक्षपदावर भाजपची मोहर उमटण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे.
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्री असेपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना सुरक्षित
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत शिवसेना शिंदे गटाला जिल्ह्यात नगरसेवकांच्या काही जागांवर विजय मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र ही संख्या एकेरी राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तुर्तास तरी कुठेही स्पर्धेत दिसत नाही. अजित पवार गटाला अकोट नगरपालिकेत चमत्काराची अपेक्षा आहे.








