Local Body Elections : पाच नगराध्यक्षपदांसाठी चुरशीची लढत!

Fierce contest for five municipal president posts : अकोला जिल्ह्यात २.२२ लाख मतदार निवडणार १४२ सदस्य;

Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी अकोला जिल्ह्यात रंगात आली आहे. पातूर नगरपालिकेची निवडणूक न्यायालयीन कारणास्तव थांबली असली तरी अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर या चार नगरपालिकांबरोबरच हिवरखेड आणि बार्शी-टाकळी या दोन नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे.

या निवडणुकीत एकूण २.२२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून पाच नगराध्यक्षपदांसह १४२ सदस्यांची निवड होणार आहे.

NCP Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

नगरनिहाय माहिती:

अकोट नगरपालिका : नगराध्यक्षपदासह ३५ जागांसाठी निवडणूक, एकूण ८२,३२५ मतदार नोंदणीकृत.

मूर्तिजापूर नगरपालिका : एकूण २५ सदस्य निवडले जाणार असून ४०,०४९ मतदार मतदान करणार.

तेल्हारा नगरपालिका : नगराध्यक्षासह २० जागांसाठी निवडणूक, एकूण १८,२४७ मतदार.

हिवरखेड व बार्शी-टाकळी नगरपंचायती : नव्याने स्थापन झालेल्या किंवा प्रथमच निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या या संस्थांमध्येही उमेदवारांच्या रस्सीखेचीत चुरस निर्माण झाली आहे.

Local Body Elections : नगराध्यक्षपदाच्या दावेदार वृषाली बोंद्रे यांचा ‘पत्ता कट’!

या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष, महाविकास आघाडी आणि स्थानिक राजकीय गटांमध्ये वर्चस्वासाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. स्थानिक राजकीय समीकरणांबरोबरच उमेदवार निवडणी, प्रचार मोहीम आणि मतदारांशी संपर्क वाढविणे हे सर्व पक्षांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. आगामी काही दिवसांत प्रचारयंत्रणा वेग घेणार असून, प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी रणनीती आखत आहे.