Local Body Elections : अकोला महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी

Final Ward Formation Approved by the State Election Commission : २० प्रभाग जैसे थे; मतदार यादी विभागणीला पुढील आठवड्यात प्रारंभ होणार

Akola अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने सादर केलेल्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. बुधवारी मुंबई येथे झालेल्या आयोगाच्या बैठकीत या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीस मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने आणि निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे उपस्थित होते.

सन २०१७ मधील महापालिका निवडणुकीत शहरात २० प्रभागांची रचना करण्यात आली होती. प्रत्येक प्रभागातून चार सदस्य निवडले गेल्याने एकूण ८० नगरसेवकांची निवड झाली होती. सध्याच्या महायुती सरकारने हीच प्रभागसंख्या आणि सदस्यसंख्या कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने यंदाही पूर्वीप्रमाणे २० प्रभाग जैसे थे ठेवत प्रभागांचे पुनर्भाजन केले.

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची राजकीय असहायता !

प्रभाग रचनेवरील नागरिकांच्या हरकती आणि सूचनांसाठी प्रशासनाने मागविलेले प्रस्ताव मोठ्या संख्येने प्राप्त झाले. एकूण ४८ हरकती प्राप्त झाल्या असून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची सुनावणी करण्यात आली होती. संबंधित सर्व सुनावण्यांनंतर अंतिम अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत या अहवालावर अंतिम मान्यता देण्यात आली.

आयोगाने प्रशासनाने सादर केलेल्या प्रभाग रचनेत कोणताही बदल न करता ती मंजूर केल्यामुळे आता पुढील निवडणूक प्रक्रिया वेगाने पार पडणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत मतदार यादी विभागणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेद्वारे प्रत्येक प्रभागातील मतदान केंद्रांची नवी विभागणी केली जाणार आहे.

Local Body Elections : नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सोडत आज !

निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी, आयोगाच्या मंजुरीनंतर निवडणुकीकडे महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीची औपचारिक तयारी आता अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे.