Local Body Elections : मतदार यादीत नाव शोधणे आता अगदी सोपे !

Finding a name in the voter list is now very easy : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी संकेतस्थळावर उपलब्ध; दोन पद्धतींनी करता येणार सहज शोध

Nagpur : नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदार यादीची प्रक्रिया जलद गतीने सुरू असून नागरिकांना आपले नाव शोधणे अधिक सोपे व्हावे, याकरिता मनपाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. 1 जुलै 2025 या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार याद्यांचे विभाजन करून तयार करण्यात आलेली ही यादी गुरुवार, 20 नोव्हेंबरपासून मनपा झोन कार्यालयांमध्ये तसेच नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

मनपाच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असून ती सहजपणे डाउनलोडही करता येते. यामध्ये ईपिक (EPIC) क्रमांकाच्या आधारे नाव शोधण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून नाव किंवा ईपिक क्रमांकाद्वारेही आपले नाव तपासता येणार आहे.

Constitution Day : विधीमंडळ ते न्यायपालिका : भारतीय संविधानाची अमूल्य देणगी !

पहिली पद्धत..
मतदार यादी शोधण्यासाठी सर्वप्रथम https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. पानावर ‘मनपा निवडणूक 2025’ हा पॉप-अप दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडोमध्ये ‘Draft Voter List 2025’ हा पर्याय उघडेल. येथे सर्व प्रभागनिहाय प्रारूप याद्या दाखवल्या जातील. आपला प्रभाग निवडून पीडीएफ उघडल्यानंतर ‘Ctrl + F’ हा शॉर्टकट वापरून सर्च बॉक्स उघडता येतो. सर्च बॉक्समध्ये आपला ईपिक (EPIC) क्रमांक—उदा. YKBXXXX—टाकताच तुमचे नाव लगेच दिसून येईल.

दुसरी पद्धत..
https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी मनपाच्या संकेतस्थळावरील ‘Search Name In The Voter List Of Maharashtra’ या पॉप-अपवर क्लिक केल्यास थेट संबंधित पृष्ठावर जाता येते. या पृष्ठावर नावाने किंवा ईपिक क्रमांकाने माहिती शोधण्यासाठी दोन वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. नावाने शोध करताना जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि स्वतःचे नाव अशी आवश्यक माहिती भरून ‘Search’ वर क्लिक करावे. काही क्षणांतच तुमची माहिती स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

Local Body Elections : ‘रसद’ रोखण्यासाठी ९० पथकांचा कडक ‘वॉच’!

ईपिक क्रमांकाने शोधण्यासाठी EPIC क्रमांक आणि दिलेली मागील माहिती भरून ‘Search’ केल्यावर तुमची संपूर्ण मतदार नोंद सहज दिसेल. मनपाने केलेल्या या ऑनलाइन सोयीमुळे नागरिकांना स्वतःची नोंद तपासणे, नावातील चुका दुरुस्त करणे किंवा माहिती अद्ययावत करणे अत्यंत सुलभ झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनी सहभाग नोंदवावा, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.